शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गड राखला, जामनेर नगरपरिषदेत भाजपाला १०० टक्के यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:55 AM

साधना महाजन आठ हजारांवर मताधिक्याने विजयी

ठळक मुद्देनगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या २५ जागांवर विजय१०० टक्के भाजपच्या ताब्यात

मोहन सारस्वत / लियाकत सय्यद /ऑनलाइन लोकमतजामनेर, जि.जळगाव, दि. १२ - राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर येथील नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपाने लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व २४ जागांवर विजय मिळवित १०० टक्के यश मिळविले आहे. या निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या पत्नी व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व विद्यमान नगराध्यक्षा साधना महाजन यांना १७८९३ तर प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार प्रा. अंजली पवार यांना ९५४० मते मिळाली. महाजन या ८३५३ मतांनी निवडून आल्या.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस आघाडीने १४ जागा मिळवित सत्ता मिळविली होती. प्रथम अडीच वर्षे आघाडीचे पारस ललवाणी हे नगराध्यक्ष राहिल्यानंतर पुढील अडीच वर्षांनी साधना महाजन या आघाडीच्याच काही सदस्यांच्या पाठिंब्याने नगराध्यक्ष झाल्या होत्या. आता या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी पूर्ण शक्ती पणाला लावून सर्व २४ जागांवर विजय मिळवून तालुक्यावर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले. २२दरम्यान, सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी जाहीर केले.भाजपाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणेलोकनियुक्त नगराध्यक्ष - साधना गिरीश महाजन. प्रभाग १ अ - प्रवीण सुधाकर नरवाडे, प्रभाग १ ब - ज्योती धोंडू पाटील, प्रभाग २ अ - बाबूराव उखर्डू हिवराळे, प्रभाग २ ब - किरण गणेश पोळ, प्रभाग ३ अ - रिजवान अब्दुल लतिफ शेख, प्रभाग ३ ब - रशीदाबी अमीरोद्दीन शेख, प्रभाग ४ अ - शेख अनिस शेख बिसमिल्ला, प्रभाग ४ ब - बतुलबी यासीन शेख (बिनविरोध), प्रभाग ५ अ - नाजीम वजीर शेख, प्रभाग ५ ब - मन्यार सुरय्याबी अब्दुल मुनाफ (बिनविरोध), प्रभाग ६ अ - आतीष छगन झाल्टे, प्रभाग ६ ब - शीतल दत्तात्रय सोनवणे, प्रभाग ७ अ - प्रमोद रवींद्र वाघ, प्रभाग ७ ब - सयाबाई माधव सुरवाडे, प्रभाग ८ अ - प्रशांत भागवत भोंडे, प्रभाग ८ ब - ज्योती जयेश सोन्ने, प्रभाग ९ अ - शरद मोतीराम पाटील, प्रभाग ९ ब - लीना सुहास पाटील, प्रभाग १० अ - उल्हास दशरथ पाटील, प्रभाग १० ब - मंगला सुधाकर माळी, प्रभाग ११ अ - महेंद्र कृपाराम बाविस्कर, प्रभाग ११ ब - संध्या जितेंद्र पाटील, प्रभाग १२ अ - रतन रामू गायकवाड, प्रभाग १२ ब - खान नजमुन्नीसाबी रमजान खान.निकाल जाहीर होताच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला व भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे भाजपचा ध्वज घेऊन सहभागी झाले. या वेळी गुलालाची उधळण करण्यात आली.

टॅग्स :ElectionनिवडणूकJamnerजामनेर