भाजपाने केला महापौरपदावर दावा
By Admin | Updated: October 10, 2015 01:23 IST2015-10-10T01:23:17+5:302015-10-10T01:23:17+5:30
जळगाव : मनपा स्थायी समिती सभापतीपदाचा खाविआने दिलेला प्रस्ताव नाकारत भाजपाने अवघ्या 15 सदस्यांच्या जिवावर महापौरपदावर दावा केला आहे.

भाजपाने केला महापौरपदावर दावा
जळगाव : मनपा स्थायी समिती सभापतीपदाचा खाविआने दिलेला प्रस्ताव नाकारत भाजपाने अवघ्या 15 सदस्यांच्या जिवावर महापौरपदावर दावा केला आहे. खाविआने महापौरपद व स्थायी समिती सभापतीपद भाजपाला देण्याचा प्रस्ताव दिला तरच श्रेष्ठींपुढे विनंती करेल, असे भाजपाचे माजी महानगराध्यक्ष बालाणी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. खाविआने स्थायी समिती सभापतीपद भाजपाला देण्याची तयारी दर्शविली असून त्याबदल्यात भाजपाने महापौर व उपमहापौरपदासाठी खाविआला पाठिंबा जाहीर करण्याची मागणी केली होती. तसा प्रस्ताव भाजपाचे भगत बालाणी यांना दिला होता. त्यावर बालाणी यांनी शहर विकासासाठी खाविआने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भाजपाला दोन्ही पदे देण्याची मागणी केली आहे. खाविआने भाजपाचा प्रस्ताव मान्य केल्यास उपमहापौरपद व महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी पाठिंबा देईल, असा प्रस्ताव बालाणी यांनी दिला आहे.