भाजपचा ४१ वा वर्धापनदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST2021-04-07T04:17:04+5:302021-04-07T04:17:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारतीय जनता पक्षाचा ४१ वा वर्धापनदिन मंगळवारी भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे साजरा करण्यात आला. ...

BJP celebrates 41st anniversary | भाजपचा ४१ वा वर्धापनदिन साजरा

भाजपचा ४१ वा वर्धापनदिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भारतीय जनता पक्षाचा ४१ वा वर्धापनदिन मंगळवारी भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्या हस्ते पक्ष ध्वजवंदन करण्यात आले, तर प्रतिमापूजन प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्तीसगड येथील नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व जिल्हा महानगर उपाध्यक्षा शरिफा तडवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना यावेळी माजी महापौर भारती सोनवणे, स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, अमित भाटीया, सुशील हासवाणी, उज्ज्वला बेडाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP celebrates 41st anniversary