नोटाबंदीचा भाजपाला जि.प. निवडणुकीत फटका बसेल - सुरेशदादा जैन
By Admin | Updated: February 13, 2017 21:50 IST2017-02-13T21:50:47+5:302017-02-13T21:50:47+5:30
भाजपा सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला, पण त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ यांना प्रचंड त्रास झाला. त्यांना रांगेत उभे राहावे लागले

नोटाबंदीचा भाजपाला जि.प. निवडणुकीत फटका बसेल - सुरेशदादा जैन
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 13 - भाजपा सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला, पण त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ यांना प्रचंड त्रास झाला. त्यांना रांगेत उभे राहावे लागले. ग्रामीण भागात या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेतकºयांच्या मनात राग असून तो, जि.प. निवडणुकीत शेतकरी मतदानातून व्यक्त करतील. भाजपाला नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसेल, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सोमवारी भोकर (ता.जळगाव) येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत व्यक्त केले.
या सभेला पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेशदादांची अनेक वर्षानंतर ही पहिलीच जाहीर सभा असल्याने ती ऐकण्यासाठी अगदी विदगाव, आव्हाणे भागातील ग्रामस्थ या सभेला आले होते.
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी
शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना कर्ज माफ व्हावे, शेती कर्ज माफी व्हावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मागील तीन वर्षे सरकारकडे मागणी करीत आहे. वारंवार हा मुद्दा शिवसेनेकडून सरकारकडे मांडला जात आहे. सरकारने त्याबाबत सकारात्मक विचार करायला हवा.
प्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्याचीही शिवसेनेची भूमिका
शिवसेना फक्त मते मागत नाही. शेतकºयांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी सतत आग्रही असते. शेतकºयांच्या प्रश्नांवर प्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिकाही शिवसेनेची आहे. फक्त मतांचे राजकारण सेना करीत नाही, असेही सुरेशदादा म्हणाले.