भाजपा पुन्हा गतवैभवाकडे

By Admin | Updated: October 21, 2014 13:21 IST2014-10-21T13:21:16+5:302014-10-21T13:21:16+5:30

जळगावची जागा सेनेकडून तर भुसावळची जागा राष्ट्रवादीकडून भाजपाने ताब्यात घेतली आहे. २00४ मध्ये ताब्यात असलेली रावेर व चाळीसगावची जागाही भाजपाने पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून घेतली आहे.

BJP again goes back to glory | भाजपा पुन्हा गतवैभवाकडे

भाजपा पुन्हा गतवैभवाकडे

 

२00४ ची पुनरावृत्ती : भाजपाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
 
१९ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात भाजपाने सर्वाधिक सहा जागा पटकावल्या. २00९ मध्ये फक्त मुक्ताईनगर व जामनेर या दोन जागांवर भाजपाला समाधान मानावे लागले होते. आता आणखी चार जागा मिळविल्या आहेत. त्यात जळगाव आणि भुसावळ विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. 
जळगावची जागा सेनेकडून तर भुसावळची जागा राष्ट्रवादीकडून भाजपाने ताब्यात घेतली आहे. २00४ मध्ये ताब्यात असलेली रावेर व चाळीसगावची जागाही भाजपाने पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून घेतली आहे. २00४ मध्ये अमळनेरचीही जागा भाजपाकडे होती. २00९ मध्ये ती अपक्ष आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी ताब्यात घेतली. २0१४ मध्ये ती भाजपाकडे येईल, अशी अपेक्षा होती मात्र मतदारांनी अपक्ष शिरीष चौधरी यांना कौल दिला व अपक्षांची परंपरा कायम ठेवली आहे. २00४ च्या तुलनेत भाजपाने एक जागा जास्त मिळविली आहे. 
२00४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने एरंडोल व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या जागा आपल्याकडे राखल्या होत्या. आता २0१४ मध्ये पुन्हा दोन्ही जागा भाजपाने मिळविल्या आहेत म्हणजेच भाजपाची गतवैभवाकडे वाटचाल सुरू झाल्याचे दिसून येते.
मोदी लाटेचा प्रभाव आणि एकनाथराव खडसे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी केलेले भावनिक आवाहन या दोन कारणांमुळे जिल्ह्यात भाजपाने पुन्हा एकदा मुसंडी मारलेली दिसून येते. 
एकनाथराव खडसे व गिरीश महाजन या भाजपातील दोन्ही नेत्यांमध्ये वाद आहेत. मात्र ते निवडणुकीत कोठेही दिसले नाही की त्याचा परिणामही निवडणुकीवर झाला नाही. भाजपा एकसंघपणे काम करताना दिसली, त्याचे फळ पक्षाला मिळाले आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी एकसंघपणे दिसून आली नाही. नेतेही प्रचारात फारसे दिसले नाहीत. त्याचा फटका पक्षाच्या उमेदवारांना बसला. फक्त एरंडोलची एकमेव जागा राष्ट्रवादीला मिळाली. भुसावळ, चाळीसगाव, जळगाव ग्रामीण, चोपडा आणि पाचोरा या पाच जागा राष्ट्रवादीने गमाविल्या. काँग्रेसचा सफाया काँग्रेसला जिल्ह्यातील एकही जागा मिळविण्यात यश मिळालेले नाही. २00४ मध्ये काँग्रेसकडे यावलची जागा होती. २00९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने यावल मतदारसंघ राहिला नाही. रावेर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले शिरीष चौधरी काँग्रेसचे सहयोगी सदस्य बनले. २0१४ ला त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली मात्र त्यांचा पराभव झाला.
सेनेलाही फायदा 
२00४ मध्ये सेनेकडे चोपडा, एरंडोल व पाचोरा या तीन जागा ताब्यात होत्या. २00९ मध्ये त्यापैकी फक्त एरंडोलची जागा तसेच जळगावची एक अशा दोनच जागांवर सेनेला यश मिळाले. २0१४ मध्ये पुन्हा एकदा सेनेने २00४ मध्ये ताब्यात असलेल्या जागा मिळविल्या आहेत. 
■ पहिल्यांदाच जळगाव शहर व भुसावळात कमळ फुलले
■ २00४ मध्ये मिळविलेल्या आणि २00९ मध्ये गमाविलेल्या जागा (अमळनेर अपवाद) भाजपाने आपल्या ताब्यात घेतल्या. 
■ राष्ट्रवादीच्या दोन व सेनेची एक जागा भाजपाने आपल्याकडे खेचून घेतली. जळगाव : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यात ११पैकीसर्वाधिक सहा जागा पटकावून गतवैभवाकडे वाटचाल सुरू केली आहे. भाजपाची ही आतापर्यंतची जिल्ह्यातील सवरेत्तम कामगिरी आहे.

 

Web Title: BJP again goes back to glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.