शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसच ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस; तब्बल २१ तासानंतर सापडले मृतदेह, बऱ्हाणपुरच्या धबधब्यात बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 18:34 IST

Accident : जयेश माळी याचा रविवारी वाढदिवस होता, त्याच दिवशी त्याला मृत्यूने कवटाळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव :  वाढदिवसाचे औचित्य साधून मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर येथील बसाली धबधब्यावर पर्यटनाला गेलेले जयेश रवींद्र माळी (वय २४, रा.वाघ नगर) व अक्षय उर्फ उज्ज्वल राजेंद्र पाटील (वय २३, रा.खेडी,जळगाव) दोन तरुण रविवारी दुपारी चार वाजता धरणात बुडाले. दोघांचे मृतदेह २१ तासांनी अर्थात दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी १ वाजता  धबधब्यात आढळून आले. जयेश माळी याचा रविवारी वाढदिवस होता, त्याच दिवशी त्याला मृत्यूने कवटाळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश याचा वाढदिवस असल्याने त्याच्यासह १६ मित्रांनी बर्‍हाणपूर येथील बसाली धबधब्यावर जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार जयेश, उज्ज्वल व त्याचा लहान भाऊ यांच्यासह सर्व मित्र वेगवेगळया वाहनाने रविवारी सकाळी ८ वाजता बर्‍हाणपूरकडे रवाना झाले. त्याठिकाणी पाण्यात खेळत असतांना जयेशचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. त्याला वाचवितांना उज्ज्वलही पाण्यात बुडाला. 

घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाल्याने दोघांच्या शोधार्थ रात्री ११ वाजेपर्यंत शोध मोहिम राबविण्यात आली. मात्र दोघेही सापडले नाही. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सोमवारी सकाळपासून शोध मोहिम राबविण्यात आली. दुपारी १२.३० वाजता धबधब्याच्या एका कपारीत अडकलेले दोघांचे मृतदेह मिळून आले. त्यांची ओळख पटविली असता जयेश व उज्ज्वल हे दोघेचे असल्याचे समोर आले.

दोघांचे मृतदेह पाहून कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. दोघांचे मृतदेह बर्‍हाणपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. शवविच्छेदनानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात