भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे ३६ हजारांचे बिल झाले २३ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:52 IST2020-06-27T15:51:48+5:302020-06-27T15:52:43+5:30

भुसावळ : तालुक्यातील किन्ही गावातील शेतकऱ्यांना अतिरिक्त व चुकीचे वीज बिल देण्यात आले होते. ३ अश्वशक्तीच्या पंपाला मागील दीड ...

The bill of 36 thousand farmers of Bhusawal taluka became 23 thousand | भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे ३६ हजारांचे बिल झाले २३ हजार

भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे ३६ हजारांचे बिल झाले २३ हजार

ठळक मुद्दे शिवसेना तालुका संघटकांच्या पाठपुराव्याला यशवीज बिलाच्या तक्रारी असल्यास संपर्क साधावा

भुसावळ : तालुक्यातील किन्ही गावातील शेतकऱ्यांना अतिरिक्त व चुकीचे वीज बिल देण्यात आले होते. ३ अश्वशक्तीच्या पंपाला मागील दीड वर्षांपासून तीन महिन्याला १,९५० युनिटचे ३७ हजार ५६० रुपयाचे देयक देण्यात आले होते. या भागात वेगवेगळ्या क्षेत्राच्या शेतीला समान १९५० युनिटचे बिल देण्यात आले व शेतकºयांचा संताप अनावर झाला व शिवसेनेकडे तक्रार केली.
भुसावळ ग्रामीण विभागाचे अभियंते डी.पी.धांडे यांच्यासमोर शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, अविनाश पाटील, सागर वाघोदे, योगेश कोलते यांनी सदर चुकीचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर त्यांनी कार्यवाही केली. तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे तालुक्यातील शेतीपंपाच्या अतिरिक्त बिलाविरोधात तक्रार दाखल केलेली होती, शेतकºयाचे ३६ हजार ५६० रुपयांचे बिल २३ हजार ३५० झाले व शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी भुसावळ तालुक्यातील शेतकºयांनी बिलासंबंधीच्या तक्रारी असल्यास शिवसेना पदाधिकाºयांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 

Web Title: The bill of 36 thousand farmers of Bhusawal taluka became 23 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.