दुचाकी घसरल्याने बाजूला बसले तितक्यात चोरट्याने दुचाकी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST2021-04-19T04:14:07+5:302021-04-19T04:14:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खेडी येथे मित्राला सोडण्यासाठी जात असताना अचानक दुचाकी घसरली. हाता - पायाला दुखापत झाली ...

दुचाकी घसरल्याने बाजूला बसले तितक्यात चोरट्याने दुचाकी लांबविली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खेडी येथे मित्राला सोडण्यासाठी जात असताना अचानक दुचाकी घसरली. हाता - पायाला दुखापत झाली म्हणून जवळच असलेल्या रसवंतीवर दोघे मित्र बसले. तितक्यात अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेल्याची घटना १४ एप्रिल रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास कालंका माता मंदिराजवळ घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज वसंत माळी हे कालंका माता मंदिराजवळ राहतात. १४ एप्रिल रोजी रात्री १ वाजता ते मित्र शरद पाटील यांना त्यांच्या खेडी येथील घरी सोडण्यासाठी दुचाकी (क्र. एमएच १९ एक्स ११२२) ने निघाले होते. खेडीकडे जात असताना कालंका माता मंदिराच्या काही अंतरावर दुचाकी घसरली व दोघेही खाली पडले. हाता-पायाला दुखापत झाली म्हणून काही अंतरावर असलेल्या बाकावर जाऊन दोन्ही मित्र बसले. तेवढ्यात चोरट्याने माळी यांची दुचाकी सुरू करून तेथून पोबारा केला. कुणीतरी आपली दुचाकी घेऊन जात असल्याचे लक्षात येताच, माळी यांनी आरडा-ओरड केली. मात्र, चोरटा दुचाकी पळवून नेण्यास यशस्वी झाला. अखेर शनिवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृउबाजवळून दुचाकी लंपास
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरून रमेश पुंडलिक चौधरी (रा. विठ्ठलपेठ) यांची दुचाकी (क्र. एमएच १९ बीएल ८४२३) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.