जळगावकरांना मोठा दिलासा, कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 13:23 IST2020-03-31T13:19:44+5:302020-03-31T13:23:08+5:30
जळगाव : जळगाव येथे आढळून आलेल्या 49 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. जळगाव येथे ...

जळगावकरांना मोठा दिलासा, कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह
जळगाव : जळगाव येथे आढळून आलेल्या 49 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल 49 वर्षीय इसमाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांनतर त्याच्या संपर्कातील 24 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्या लाळेचे नमुने औरंगाबाद येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाला. या 24 जनांसह इतर 2 असे 26 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.
यामुळे जळगावकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.