शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोठे रॅकेट, मोठा गोरखधंदा, गेली अनेक वर्षे सुरळीतपणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 23:03 IST

ओडिशात पकडलेला कासोदा परिसरातील पोलीस पाटील हा छोटा मासा असून अनेक वर्षे अत्यंत छोट्याशा खेडेगावात हा गांजा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू आहे.

ठळक मुद्देकासोद्यातील गांजा प्रकरणपोलीस पाटील हा छोटा मासा असल्याची कुजबुज

लोकमत न्यूज नेटवर्क

कासोदा : ओडिशात पकडलेला कासोदा परिसरातील पोलीस पाटील हा अतिशय छोटा मासा असून गेली अनेक वर्षे अत्यंत छोट्याशा खेडेगावात हा गांजा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. हा व्यवसाय करणाऱ्यांनी शेती खरेदीसह मोठी आर्थिक उलाढाल केली असल्याचीदेखील माहिती मिळत आहे.

८ जून रोजीची ओडिशातील एका न्यूज चॅनलची आरोपींचे फोटो असलेली एक व्हिडीओ क्लीप या परिसरातील प्रत्येक मोबाइलमध्ये पोहोचली असून, या प्रकाराची मोठी चर्चा येथे सुरू आहे. हा धंदा गेली अनेक वर्षे सुरू आहे. संबंधितांनी या धंद्यातून मोठी माया जमवली आहे. या धंद्याची सूत्रे परिसरातील अनेक खेडेगावात तर आहेतचस पण धुळे व नासिक येथील अनेक मोठी धेंडेदेखील यात सहभागी असल्याची जोरदार चर्चा आहे.

गांजा खरेदीसाठी रोख रक्कम लागत नाही. खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मुलगा, भाऊ किंवा जवळचा नातेवाईक खरेदीदाराकडे सेक्युरिटी म्हणून ठेवण्यात येतो. पैसे दिल्यावर हा नातेवाईक घरी येतो. एकाच वेळी दहा-बारा क्विंटलपासून जशी विक्रीची लाइन असेल, तसा जास्त मालदेखील उचलला जातो. रस्त्यात माल पकडला जाणार नाही, याची मोठी खबरदारी घेण्यात येते व मोठी रोख रक्कम सोबत बाळगली जाते. पैसे मोजल्यावर कुणी ही गाडी अडवत नाही, अशी चर्चा आहे.

अजामीनपात्र गुन्हा

हा माल पकडल्यावर या गुन्ह्यात जामीन मिळत नाही. गुन्हा सिद्ध झाल्यास किमान दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती कायद्याचे जाणकार ॲड. भोसले यांनी दिली आहे. कडक शिक्षेची तरतूद असल्याने माल पकडल्यावर कितीही पैसे मोजून गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी या टोळीचा प्रयत्न असतो. एकाच तडजोडीत लाखो रुपये मोजून देण्याचीदेखील या टोळीची क्षमता असते, असेदेखील या टोळीच्या खास मित्रांकडून होत असलेल्या चर्चेतून माहिती मिळत आहे.

या परिसरापासून ओडिशा किमान हजार ते पंधराशे कि.मी. आहे. दोन-तीन राज्यांच्या सीमा लागतात. तरी हा अवैध माल किती बिनबोभाट येतो व जातो. यामुळे आपल्या सुरक्षा व तपास यंत्रणा किती जोरदारपणे कार्यान्वित आहेत, अशीदेखील चर्चा होत आहे.

ओडिशा राज्यातील पोलीस अधिक तपासासाठी आमच्याकडे येतीलच. पण अजून आलेले नाहीत. याबाबत भरपूर चर्चा असल्याने आम्ही अनेकदा या परिसरात झाडाझडती घेतली आहे, पण येथे काहीही मिळून आलेले नाही. पण आता या आरोपींकडून अधिक माहिती मिळू शकते, असे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी सांगितले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोलCrime Newsगुन्हेगारी