शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

उद्ध्वस्त कुटुंबाला मोठय़ा भावाचा आधार

By admin | Updated: April 4, 2017 12:46 IST

घराला आग लागल्याने संसाराची राख रांगोळी झाली. लहान भाऊ संकटात सापडल्याने मोठा भाऊ मदतीला धावल्याने आगीत सर्वस्व गेलेल्या दत्तात्रय माळी यांना आधार मिळाला आहे.

 ऑनलाई लोकमत/दीपक पाटील  

धुळे, दि.4- घराला आग लागल्यामुळे लहान भावाच्या संसाराची झालेली राखरांगोळी व त्याचा संसार रस्त्यावर आल्याचे पाहून कापडणे गावातील दत्तात्रय देवराम माळी यांचे मोठे भाऊ शांताराम माळी हे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. दत्तात्रय यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांनी त्यांच्या घरात आश्रय दिला. त्यामुळे मोठय़ा भावाचे उदात्त प्रेम पाहून  दत्तात्रय माळी यांना आधार मिळाला. दरम्यान, माळी कुटुंबाला दु:खातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधीही सरसावले असून आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. 
 येथील विठ्ठल मंदिराच्या समोर राहणारे दत्तायत्र देवराम माळी यांच्या 12 गाळ्यांच्या लाकडी घराला रविवारी आग लागली. या घटनेत त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. या आगीच्या घटनेनंतर  त्यांचे मोठे भाऊ शांताराम यांनी त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
2 ट्रॅक्टर माती फेकली 
आगीच्या घटनेमुळे दत्तात्रय माळी यांच्या घराची संपूर्णत: राखरांगोळी झाली होती. हे भयावह दृश्य पाहून ते पूर्णत: खचून गेले होते. त्यात पंचनामा रविवारी सायंकाळर्पयत पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्या घरातील जळून खाक झालेला सामान व दोन ट्रॅक्टर माती बाहेर काढून ती गावापासून दूर अंतरावर फेकून दिली. 
कैफियत मांडताना अश्रू अनावर..
सोमवारी दिवसभरात माळी कुटुंबाला या दु:खातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ त्यांचे मोठे भाऊ शांताराम माळी यांच्या घरात गर्दी करत होते. दत्तात्रय माळी यांच्या प}ी सुरेखा माळी या ग्रामस्थांपुढे त्यांची कैफियत मांडताना त्यांचे अश्रू अनावर होत असल्याचे दिसून आले. 
हलाखीच्या परिस्थितीत जीवन 
दत्तात्रय माळी हे हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते. मोठय़ा मुश्किलीने  कर्ज काढून त्यांच्या शेतात कापूस, गहू, हरभरा विक्री केला होता. त्याबदल्यात त्यांना 70 हजार रुपये रोख मिळाले होते. या पैशांतूनच पीक कर्ज व इतर देणी ते देणार होते. मात्र, तत्पूर्वीच आगीच्या घटनेत त्यांचे हे पैसेही जळाल्यामुळे दत्तात्रय माळी यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. 
माजी मंत्र्यांनी घेतली भेट 
घटनेनंतर दत्तात्रय माळी यांची धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील व माजी जि. प. सदस्य बापू खलाणे, प्रा. रवींद्र निंबा पाटील, नूतन विद्यालयाचे चेअरमन संजय युवराज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल पाटील उपस्थित होते. माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी माळी कुटुंबीयांची सोमवारी सायंकाळी भेट घेतली. त्यांचे सांत्वन केल्यानंतर त्यांनी तहसीलदार अमोल मोरे यांना संपर्क साधून माळी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगितले.