१८ जिल्ह्यातील बडे कर्जदार व एजंट रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:15+5:302021-06-21T04:13:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआरमधील ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणात आता आणखी राज्यातील १८ जिल्ह्यातील बडे कर्जदार, त्यांना ...

१८ जिल्ह्यातील बडे कर्जदार व एजंट रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बीएचआरमधील ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणात आता आणखी राज्यातील १८ जिल्ह्यातील बडे कर्जदार, त्यांना कमी किमतीत पावत्या खरेदी करुन देणारे एजंट व जमिनी खरेदी करणारे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. त्यात राजकीय क्षेत्र, बिल्डर व उद्योजकांचा समावेश आहे. पुणे पोलिसांकडून माहिती संकलित केली जात असून पुरावे मिळताच, पुन्हा अटकसत्र राबविले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव, धुळे व औरंगाबाद या जिल्ह्यात कारवाईचा फास आवळल्यानंतर पुढचा मोर्चा राज्यातील इतर १८ जिल्ह्यात वळविला जाण्याची शक्यता आहे. त्यात परभणी, अहमदनगर, वाशिम, यवतमाळ, नागपूर, नाशिक, वर्धा, अमरावती, अकोला, बीड, सांगली, सोलापूर, लातूर, बुलडाणा, नांदेड, सातारा, जालना, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.