शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

विशेष उत्सव गाड्यांमुळे भुसावळ रेल्वे विभागाची  कोटी की कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 15:49 IST

रेल्वे प्रशासनातर्फे अनलॉक प्रक्रियेनंतर हळूहळू गाड्यांची संख्या वाढविण्यात येत आहे

ठळक मुद्दे फक्त भुसावळ स्थानकावरून तिकीट खिडकीवरून झाली १ कोटी २० लाखांची बुकिंगतत्काल तिकीट यावेळेस दलाल मात्र सक्रियरेल्वे प्रशासनातर्फे अनलॉक प्रक्रियेनंतर हळूहळू गाड्यांची संख्या वाढविण्यात येत आहे

वासेफ पटेलभुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे अनलॉक प्रक्रियेनंतर हळूहळू गाड्यांची संख्या वाढविण्यात येत आहे, महिन्याभरात भुसावळ विभागातून तब्बल ११२  गाड्या सुरू करण्यात आल्या. या गाड्यांच्या माध्यमातून भुसावळ विभागाला १६ कोटींची व भुसावळ रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवरून १ कोटी २० लाखांची कमाई रेल्वे प्रशासनास प्राप्त झाली. मात्र तत्काळ तिकीट बुकींग वेळेस तेच तेच चेहरे तिकिट खिडकीवर असल्यामुळे सामान्यांना मात्र तत्काळ तिकीट मिळत नाही. 

रेल्वे प्रशासनातर्फे अनलॉक प्रक्रियेनंतर बऱ्याच अंशी  ‘सुसाट रेल्वे वेळेवर रुळावर’ आलेली आहे. भुसावळ विभागातून गेल्या महिन्याभरात प्रवाशांसाठी तब्बल ११२ गाड्या सुरू करण्यात आल्या यातील ५०  उत्सव गाड्या म्हणून धावत आहे तर ६२ गाड्या ह्या विशेष गाड्या म्हणून धावत आहे. 

गेल्या महिन्याभरात भुसावळ रेल्वे विभागातून तब्बल ३ लाख ६९ हजार ९९४ प्रवाशांनी तिकीट काउंटरवरून बुकिंग केली यातून रेल्वेला १५कोटी ९५ लाख ४७ हजार ४६ रुपयाचे उत्पन्न मिळाले, तर याच काळामध्ये फक्त भुसावळ रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरून ७३ हजार ३५० प्रवाशांनी तिकीट बुकिंग केली. यातून रेल्वेला एक कोटी १८ लाख ६२ हजार ३९१ इतके उत्पन्न प्राप्त झाले. ऑनलाइन होते ४० टक्के बुकिंगरेल्वे तिकीट खिडकीच्या व्यतिरिक्त अनेक प्रवासी हे आरक्षण कार्यालयातून तिकीट बुकिंग न करता ऑनलाइन तसेच आयआरसीटीसीच्या एजंटद्वारे तिकीट बुकिंग करत असतात या माध्यमातल्यासुद्धा रेल्वेला सुमारे ४० टक्के वेगळे उत्पन्न प्राप्त होते.दलालांचा तत्काळ तिकीट खिडकीवर विळखालांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वेळेवर तिकीट बुकिंग करता यावी याकरिता सामान्य व्यक्ती हे सकाळी अकराला सुरू होणाऱ्या तत्काळ तिकीटासाठी दोन तासापूर्वी रांगेत नंबर लावत असतात. टोकनद्वारा तत्काळ खिडकीवर नंबर लावण्यात येत असतो. मात्र सक्रिय दलाल हे आपले पंटर पाठवून सामान्य व्यक्तीच्या आधीच आपले नंबर लावतात. तेच ते चेहरे तत्काळ तिकीट बुक करत असतात. यामुळे सामान्य व्यक्तीला तिकीट उपलब्ध होत नाहीत व तेच तिकीट ते दलालाकडून चढ्या भावाने नाइलाजाने घ्यावे लागत असतात. रेल्वे प्रशासनाने गेल्या काही दिवसांचे सीसीटीवी फुटेज तपासल्यास त्यांना तेच ते चेहरे आलेले असल्याचे निदर्शनास येतील, अशी प्रतिक्रिया तत्काळ तिकीट खिडकीच्या वेळेस उभे राहून तिकीट न मिळाल्या सामान्य नागरिकांकडून मिळाल्या.

सोशल डिस्टन्सिंग नाहीचरेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर तिकीट बुकिंग करण्यात येणाऱ्यांसाठी कुठलाही प्रकारचे उपाययोजना केलेले नाही. तिकीट काऊंटरवर कुठलाही प्रकारचे सोशल डिस्टन्स ठेवले जात नाही. मात्र जे कर्मचारी तिकीट बुकिंग करत असतात त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी फक्त नावाची व्यवस्था व सुरक्षा न लावता नियमाचे पालन केले जातील या पद्धतीचे कामकाज असावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ