भुसावळ पंचायत समिती सभापतींच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST2020-12-03T04:29:44+5:302020-12-03T04:29:44+5:30
भुसावळ पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानी चोरी पाण्याची मोटार व गॅस सिलिंडर चोरीस भुसावळ, जि.जळगाव : पंचायत समितीच्या ...

भुसावळ पंचायत समिती सभापतींच्या
भुसावळ पंचायत समिती सभापतींच्या
निवासस्थानी चोरी
पाण्याची मोटार व गॅस सिलिंडर चोरीस
भुसावळ, जि.जळगाव : पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यात इलेक्ट्रिक मोटार, गॅस सिलिंडर आदी साहित्य चोरून नेले. बुधवारी ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे सभापतींचे शासकीय निवासस्थान शहर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
सभापती पाटील या कधीकधी या निवासस्थानात थांबतात. मात्र पंचायत समितीला दोन-तीन दिवसांच्या असलेल्या सुट्टीची संधी साधून चोरट्यांनी २७ रोजी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व एक हजार पाचशे रुपये किमतीचे गॅस सिलिंडर, एक जुनी विद्युत मोटार व जुने नळ असा एकूण पाच हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सभापती पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सुपडा पाटील करीत आहे.