भुसावळात सूनेनेच केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:12 IST2021-06-03T04:12:55+5:302021-06-03T04:12:55+5:30

भुसावळ : घरगुती भांडणातून सुनेनेच सासूच्या डोक्यात व पाठीवर विळ्याने वार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी ...

In Bhusawal, only gold was used | भुसावळात सूनेनेच केला

भुसावळात सूनेनेच केला

भुसावळ : घरगुती भांडणातून सुनेनेच सासूच्या डोक्यात व पाठीवर विळ्याने वार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी ६.४० वाजेच्या सुमारास प. क. कोटेचा विद्यालयाच्या आवारात घडली. या प्रकरणी सून उज्ज्वला सोनवणे (वय ३८) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे (७५) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र सोनवणे हा कोटेचा विद्यालयात सुरक्षा रक्षक आहे. शाळेच्या परिसरातच तो आई, पत्नी उज्ज्वला हिच्यासह वास्तव्यास आहे. सायंकाळच्या सुमारास रवींद्र हा काही साहित्य घेण्यासाठी गावात गेला होता. त्याचवेळी द्वारकाबाई व सून उज्ज्वला यांच्यात भांडण झाले. हे भांडण एवढ्या विकोपाला गेले की सुनेने धारदार विळ्याने सासूची मान, डोके व पाठीवर जोरदार वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात द्वारकाबाई जागीच ठार झाल्या.

काही वेळाने रवींद्र घरी परतला. त्यावेळी आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. यानंतर रवींद्र ओळखीच्या नगरसेवकाकडे गेला. नगरसेवकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर काही क्षणातच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.

Web Title: In Bhusawal, only gold was used