At Bhusawal, the municipality started measures by putting dappas on the road leading to Khadka Road | भुसावळ येथे पालिकेतर्फे खडका रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ढापा टाकून उपाययोजना सुरू
भुसावळ येथे पालिकेतर्फे खडका रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ढापा टाकून उपाययोजना सुरू

ठळक मुद्दे‘लोकमत’ वृत्ताचा प्रभावजमजम चौक व अमरदीप चौकातील वाहतूक नसरवानजी फाईल मार्गाने वळवावीदोन्ही बाजूला पक्का रस्ता हवा

वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : सुमारे ५० हजार लोकवस्तीच्या मोहम्मदअली रोड (खडका रोड) परिसराला जोडणाºया डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पुढील रस्त्यावरील कामाला अखेर प्रारंभ झाला आहे, दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने गेल्या २४ डिसेंबर रोजी ‘खडका रोडची अवस्था खड्ड्यांमुळे झाली बिकट’ अशा आशयाचे ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पालिका प्रशासनाने ढापा टाकण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
अमरदीप चौकाकडे जाणाºया मार्गावरील मध्यभागी असलेल्या गटारीची अत्यंत बिकट अवस्था झाली होती व संपूर्ण सांडपाणी हे रस्त्यावर साचले होते व त्या ठिकाणी मोठा खड्डादेखील पडलेला होता. या ठिकाणी रोज असंख्य वाहनचालकांना अपघातदेखील झाल्याचे सांगण्यात येत होते. आता मात्र पालिका वृत्ताची दखल घेऊन कामाला गटारी व धापा टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे संपूर्ण मोहम्मद अली रोड परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
मोहम्मदअली रोडवरील (खडका रोड) रजा टॉवर व पुढे महामार्गाकडे जाणारा हा प्रमुख व एकमेव मार्ग आहे आणि तो अत्यंत अरुंद आह.े या ठिकाणाहून चार चाकी वाहन सहजगत्या जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी लहान दुकाने व आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर लहान व्यावसायिक आपली रोजीरोटी कमवित असल्याने हा रस्ता आणखीनच रहदारीसाठी अडचणीचा ठरला आहे.
ठोस उपाययोजना हवी
दरम्यान, अमरदीप टॉकीज नामशेष झालेली आहे. एकेकाळच्या भुसावळचे वैभव असलेले अमरदीप थिएटर हे आता नामशेष झालेले आहे. तरी देखील त्याच नावाने हा परिसर आजही ओळखला जातो. याच रोडवर जमजम व पुढे अमरदीप चौक आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी काही वेगळी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. या दृष्टीनेही प्रयत्न करण्याची गरज आहे.
दोन्ही बाजूला पक्का रस्ता हवा
भुसावळ रेल्वेस्थानक आणि शहराच्या अन्य भागातून येणाºया आणि खडका रोडवर जाणाºया लोकांसाठी केवळ ढापा न टाकता मजबूत व टिकाऊ दर्जेदार रस्ता करण्यात यावा, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे. या कामावर पालिका प्रशासनाने त्यांचे नगर अभियंता यांना जातीने लक्ष केंद्रित करण्यासाठी सूचित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
वाहतूक वळवावी
जमजम चौक व अमरदीप टॉकीज चौक या दोन्ही चौकातील गर्दी कमी करण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व पालिका प्रशासनातर्फे या ठिकाणची वाहतूक नसरवानजी फाईल भागातून वरणगाव मार्गावर वळवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: At Bhusawal, the municipality started measures by putting dappas on the road leading to Khadka Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.