भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 15:52 IST2019-06-04T15:51:38+5:302019-06-04T15:52:51+5:30
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पथसंचलन करण्यात आले.

भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन
भुसावळ, जि.जळगाव : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पथसंचलन करण्यात आले.
जळगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भुसावळ पोलीस विभागातर्फे मोहम्मद अली रोड भागातील रजा टॉवर ते रेल्वे स्थानक चौकापर्यंत दंगा काबूची रंगीत तालीम पथसंचलन करून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
या पथसंचलनात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह अन्य दुय्यम अधिकारी, ३२ पोलीस कर्मचारी, १ आरसीपी प्लाटून, ३२ पुरूष होमगार्ड, ५ महिला होमगार्ड सहभागी झाले होते. सुमारे सव्वा तासानंतर या पथसंचलनाचा रेल्वेस्थानक चौकात समारोप झाला.