भुसावळच्या लाचखोर पोलिसाला अटक

By Admin | Updated: May 30, 2014 13:16 IST2014-05-30T00:12:20+5:302014-05-30T13:16:31+5:30

बोदवड ते जळगाव या दरम्यान वाळूची वाहतूक करीत असताना पकडलेल्या ट्रकचा वाहन परवाना व रॉयल्टीच्या पावत्या परत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी शरीफ नजीरखॉ तडवी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी जळगावात अटक केली.

Bhusaval bribery police arrested | भुसावळच्या लाचखोर पोलिसाला अटक

भुसावळच्या लाचखोर पोलिसाला अटक

जळगाव : बोदवड ते जळगाव या दरम्यान वाळूची वाहतूक करीत असताना पकडलेल्या ट्रकचा वाहन परवाना व रॉयल्टीच्या पावत्या परत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी शरीफ नजीरखॉ तडवी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी जळगावात अटक केली.
तक्रारदार यांची ट्रक क्रमांक एमएच १९ बी एम १०१० व त्यांच्या मित्राचा ट्रक नंबर एमएच १९ झेड ९०९० हे वाळू भरून २९ रोजी रात्री जळगाव येथून बोदवडकडे जात होते. या दरम्यान पोलीस कर्मचारी शरीफ तडवी याने हे ट्रक कुर्‍हे पानाचे या गावाजवळ ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ट्रकचा वाहन परवाना तसेच रॉयल्टीच्या पावत्या जप्त केल्या. तसेच कारवाई टाळण्यासाठी २० हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी तडवी याने दोघांना दहा हजारांची रक्कम घेऊन जळगावला बोलविले.
तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक डी.डी.गवारे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांना भास्कर मार्केट जवळील एलआयसीच्या कार्यालयाजवळ पाठविले. या ठिकाणी शरीफ तडवी याला दहा हजार रुपयांची लाच घेतांना या पथकाने रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचारी शरीफ तडवी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपअधीक्षक डी.डी.गवारे करीत आहेत.

Web Title: Bhusaval bribery police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.