भडगाव-कनाशी रस्त्याचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:16 IST2021-09-25T04:16:37+5:302021-09-25T04:16:37+5:30
आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून सव्वातीन कोटी रुपये मंजूर झाले. कनाशी तीर्थक्षेत्र म्हणून राज्यभरात लौकिक असून महाराष्ट्रभरातून याठिकाणी भाविक मोठ्या ...

भडगाव-कनाशी रस्त्याचे भूमिपूजन
आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून सव्वातीन कोटी रुपये मंजूर झाले. कनाशी तीर्थक्षेत्र म्हणून राज्यभरात लौकिक असून महाराष्ट्रभरातून याठिकाणी भाविक मोठ्या भक्ती भावाने दर्शनाला येत असतात त्यामुळे भाविकांची व स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प.चे माजी सदस्य विकास पाटील, डॉ. विशाल पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास पाटील, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील, बात्सरचे संजय पाटील, बाजार समितीचे प्रशासक युवराज पाटील, विजय पाटील, कोठलीचे सरपंच कांतीलाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील, माजी तालुकाप्रमुख दीपक पाटील, गोंडगावचे राहुल पाटील, बोदर्डेचे उपसरपंच बबलू पाटील, प्रकाश परदेशी, पप्पू पाटील, बांधकाम विभागाचे एस. आर. राऊत, भास्कर पाटील, भागवत पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.
फोटो— कोठली येथे रस्ता फलक अनावरण प्रसंगी आमदार किशोर पाटील, अधिकारी, शिवसेना, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नागरिक.