अमळनेरात ढेकूरोडवर सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST2021-06-20T04:12:30+5:302021-06-20T04:12:30+5:30

अमळनेर : शहरातील ढेकूरोडवरील जिजाऊ नगर भागात सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते ...

Bhumi Pujan of Social Hall on Dheku Road in Amalnera | अमळनेरात ढेकूरोडवर सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

अमळनेरात ढेकूरोडवर सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

अमळनेर : शहरातील ढेकूरोडवरील जिजाऊ नगर भागात सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील पालिका प्रभाग सातमध्ये जिजाऊ नगर येथे होत असलेल्या सामाजिक सभामंडप बांधकामाच्या अंदाजित किंमत १५ लाख रुपये कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. के. अहिरे होते.

कार्यक्रमास नगरसेवक विवेक पाटील, माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, ॲड. ज्ञानेश्वर पाटील, दिलीप पाटील, पंकज पाटील, शिवाजी सोनवणे, प्रवीण वाघ, आर. एस. सोनवणे, विजय साळुंखे, सागर पाटील, पद्माकर बडगुजर, कृष्णा बोरसे, प्रवीण बडगुजर, हर्षल पाटील, दिलीप जाधव, वसंत सूर्यवंशी, संदीप खैरनार, संजय मोरे, ज्ञानेश्वर मोरे, अरुण बोरसे यांच्यासह सहकारनगर, जिजाऊ नगर, रेहू नगर, वृंदावन नगर येथील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन अनंत सूर्यवंशी यांनी केले.

Web Title: Bhumi Pujan of Social Hall on Dheku Road in Amalnera