पेव्हर ब्लॉकच्या कामांचे ममुराबादला भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:55+5:302021-09-17T04:20:55+5:30
ममुराबाद, ता. जळगाव : येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आमदार फंडातून पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांना सुरुवात झाली असून, ...

पेव्हर ब्लॉकच्या कामांचे ममुराबादला भूमिपूजन
ममुराबाद, ता. जळगाव : येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आमदार फंडातून पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांना सुरुवात झाली असून, याचे नुकतेच ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांची मोठी समस्या दूर होणार आहे.
ममुराबाद परिसरातील नागरिकांना चांगला रस्ता नसल्यामुळे येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांच्या व ग्रामपंचायतच्या मागणीमुळे पंचायत समिती सभापती लता कोळी विशेष प्रयत्न करून आमदार फंडातून पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू केले.
भूमिपूजनप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य जनार्दन कोळी, सरपंच हेमंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्या लता कोळी, सदस्य अमर पाटील, अनिस पटेल, शैलेंद्र पाटील, संतोष कोळी, गोपाल मोरे, कल्पना शिंदे, महेश चौधरी, सचिन पाटील, विलास शिंदे, हिमांशू तिवारी, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.