नशिराबाद कब्रस्तानमध्ये पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:46 IST2021-02-20T04:46:03+5:302021-02-20T04:46:03+5:30

नशिराबाद : येथील चौपाल मोहल्ला कब्रस्थानमध्ये रस्त्यावर पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचेहस्ते करण्यात आले. ...

Bhumi Pujan of Paver Block Work at Nasirabad Cemetery | नशिराबाद कब्रस्तानमध्ये पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन

नशिराबाद कब्रस्तानमध्ये पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन

नशिराबाद : येथील चौपाल मोहल्ला कब्रस्थानमध्ये रस्त्यावर पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचेहस्ते करण्यात आले. लालचंद पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या फंडातून तीन लाख रुपयांचे निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कामात नुकताच प्रारंभ झाला असून पेव्हर ब्लॉकचे काम केल्याने चौपाल मोहल्ला पंच कमेटीकडून त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी असलम तन्वीर, शेरा अहेलेकार, अनसार अहेलेकार, वसीम अहेलेकार, समीर खान, इस्माईल मॅकनिक, रहीम ठेकेदार, बबलू खान, इमरान खान, वहीद भाई, सै. शब्बीर व अप्पी अहेलेकार आदि उपस्थित होते.

जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील भूमिपूजन करताना व त्यांच्यासोबत असलम तनवीर, शेरा अहेलेकार, अनसार अहेलेकार, वसीम अहेलेकार.

Web Title: Bhumi Pujan of Paver Block Work at Nasirabad Cemetery