कनाशी रस्ताकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:44+5:302021-09-25T04:15:44+5:30

श्रीक्षेत्र कनाशी-कजगाव हा रस्ता खराब झाल्याने या चार किलोमीटर रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे डॉ. विशाल पाटील, कजगाव ग्रामपंचायतीचे ...

Bhumi Pujan of Kanashi Roadworks | कनाशी रस्ताकामाचे भूमिपूजन

कनाशी रस्ताकामाचे भूमिपूजन

श्रीक्षेत्र कनाशी-कजगाव हा रस्ता खराब झाल्याने या चार किलोमीटर रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे डॉ. विशाल पाटील, कजगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा जय पाचपावली माता मित्रमंडळाचे सर्वेसर्वा अनिल महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य युवराज पाटील यांच्या हस्ते कजगाव रेल्वेगेटजवळ करण्यात आले.

महत्त्वपूर्ण असलेला हा मार्ग उखडून पडला होता. आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने २७३ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन झाले. हा मार्ग मंजूर झाल्यामुळे या मार्गावरील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध अशा श्री क्षेत्र कनाशी येथे जाणाऱ्या असंख्य भाविकांची रस्त्याबाबतची मोठी अडचण दूर होणार आहे. भूमिपूजनप्रसंगी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता राऊतसह जाधव, सावंत, कजगावचे ग्रामपंचायत सदस्य अनिल टेलर, उत्तम मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of Kanashi Roadworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.