सावदे गावात हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:00+5:302021-08-24T04:21:00+5:30
आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश पाटील यांच्याहस्ते या कामाचे नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. प्रमोद जोशी यांनी पूजाविधी केला. ...

सावदे गावात हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन
आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश पाटील यांच्याहस्ते या कामाचे नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. प्रमोद जोशी यांनी पूजाविधी केला. या मंदिराच्या बांधकामासाठी, सभा मंडपासाठी आमदार निधीतून १० लाख रुपये निधी देणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार किशोर पाटील यांनी दिले. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, आमदार मंगेश पाटील, डांबरुणचे सरपंच अभिमन्यू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख डाॅ. विलास पाटील, पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील, किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, भडगावचे माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, पंचायत समिती उपसभापती रावण भिल्ल, वडगावचे डाॅ. विशाल पाटील, बात्सरचे संजय पाटील, कजगावचे निवृत्ती अमृतकार, अशोक परदेशी, डांबरुणचे सरपंच अभिमन्यू पाटील, कोठली सैनिक समाधान पाटील यांच्यासह उपसरपंच भगवान परदेशी, दिनेश देसले, राजेंद्र परदेशी, संभाजी पाटील, कर्तारसिंग परदेशी, हिरालाल परदेशी, शिवाजी पाटील, माधवराव पाटील, भिमसिंग परदेशी, रुपला मोरे, संभाजी पाटील, विठ्ठल पाटील, संजय भिल्ल, पंडित पाटील, वाल्मीक पाटील, गुलाब पाटील, शिवाजी भिल्ल, जगन्नाथ पाटील, माधवराव पाटील, जगन पाटील, शिवराम पाटील, प्रमोद जोशी, ग्रामसेवक जिवराम पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. रघुनाथ देसले यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश बोरसे यांनी केले तर आभार दिनेश देसले यांनी मानले.
230821\23jal_1_23082021_12.jpg
सावदे येथे हनुमान मंदिराचे बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी उपस्थित आमदार किशोर पाटील, रावसाहेब पाटील, संजय पाटील, कर्तारसिंग परदेशी, दिनेश देसले आदी.