शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

बीएचआर: सुनील झंवरला १० दिवस कोठडी; तपासात ७२ कोटीचा अपहार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 22:33 IST

बीएचआर प्रकरणात आतापर्यंत अवसायक जितेंद्र कंडारे, कर्जदार व इतर अशा १९ जणांना अटक झालेली आहे.

जळगाव : बीएचआर पतसंस्था अपहार व फसवणूक प्रकरणात अटक केलेला मास्टरमाईंड सुनील देवकीनंदन झंवर  (वय ५९,रा.जय नगर, जळगाव) याला पुणे विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मंगळवारी सकाळी नाशिक येथून अटक केली.

बीएचआर प्रकरणात आतापर्यंत अवसायक जितेंद्र कंडारे, कर्जदार व इतर अशा १९ जणांना अटक झालेली आहे. आमदार चंदूलाल पटेल, योगेश किशोर साखला,योगेश रामचंद्र लढ्ढा, माहेश्वरी यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. कृणाल कांतीलाल शहा (रा.अहमदाबाद), रमेश रुपचंद जैन (रा.स्वातंत्र्य चौक, जळगाव) व उदयकुमार गौतमचंद कांकरीया (रा.शिवरामनगर) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने यापूर्वीच फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आतापर्यंत ७२ कोटी ५६ लाख २१ हजार १५६ रुपयांचा अपहार झाल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. दागिने व रोख रक्कम मिळून ३० लाख ५ हजार ४३६ रुपयांचा ऐवज आतापर्यंत घरझडतीत मिळून आलेली आहे.

दरम्यान, पतसंस्थेने पुण्यात २१ कोटी ३० लाखात खरेदी केलेल्या तीन मालमत्ता सुनील झंवर याने त्याच्या संस्था व त्याच्या सालासर कंपनीतील पूर्वाश्रमीचा भागीदार योगेश लढ्ढा याच्या नावाने अवघ्या ५ कोटी ७२ लाख ४४ हजार २२१ रुपयात खरेदी केल्याचेही उघड झाले आहे. त्यातही ४ कोटी २ लाख ३८ हजार ९१ रुपयांच्या ठेव पावत्या बेकायदेशीरपणे वर्ग केलेल्या आहेत.

का हवी झंवरची पोलीस कोठडी

सुनील झंवर हा आठ महिने फरार होता. त्या काळात तो दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशसह इतर ठिकाणी वास्तव्यास होता, त्यामुळे त्याने काही इलेक्ट्रॉनिक्स पुरावे नष्ट केले  किंवा लपवून ठेवले असावेत त्याचा तपास करणे, या कालावधीत तो कोणाच्या संपर्कात होता.तपासासाठी त्याला जळगाव येथे न्यायचे आहे. पिता-पूत्राच्या नावाने असलेल्या फर्मच्या नावे मालमत्ता विकत घेतल्या असून त्यासाठी झंवरनेच पैसा पुरविला आहे. कोणाच्या सांगण्यावरुन व कोणासाठी या मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत यासह कर्ज निरंक दाखले देखील या हार्डडिस्कमध्ये मिळून आल्याने ते कसे आले याची चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस