शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

जळगावच्या ‘त्या’ भोंदूबाबाला अटक, मित्रानेच फोडले बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 08:16 IST

करणी, कॅन्सर उपचाराच्या नावाखाली गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली ३२ लाख १५ हजार ८७५ रुपयांची फसवणूक करणाऱ्या पवन बापुराव पाटील (२८) या भोंदूबाबाला रामनगर पोलिसांनी रविवारी डोंबिवलीतच अटक केली. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराला करणी काढण्याबरोबरच कॅन्सर उपचाराच्या नावाखाली गंडा घातला गेला आहे.             

तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे. करणी काढण्यासाठी खर्च करावा लागेल, असे सांगून पवनने कळवा येथे राहणाऱ्या प्रियंका राणेसह डोंबिवलीतील तिच्या आईच्या बँक खात्यातून ३१ लाख सहा हजार ८७४ रुपये वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यात ऑनलाइनद्वारे ट्रान्सफर करवून घेतले होते. त्याचबरोबर एक लाख नऊ हजार रुपये किमतीच्या भेटवस्तूही त्याने घेतल्या. दरम्यान, फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच प्रियंकाने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. मात्र, याची खबर पवनला लागू न देता प्रियंकाने त्याला डोंबिवलीत बोलावून घेतले आणि तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पवन हा अविवाहित असून, तो त्याच्या जळगावातील आपल्या गावी दरबार भरवायचा अशीही माहिती समोर आली आहे.  पोलीस निरीक्षक सुरेश सरडे यांचे पथक जळगावला रवाना झाले आहे.

आजार बरा करतोप्रियंकाच्या वडिलांना कॅन्सर होता. मला दैवी शक्ती प्राप्त आहे. त्यामुळे माझ्या उपचाराने तुमचे वडील कॅन्सरमुक्त होतील असे सांगून पवनने उपचारासाठी काही पैसे घेतले. परंतु, वडील त्या आजारातून बरे झाले नाही, त्यात त्यांचा मृत्यू झाला. कोणी तरी तुमच्या वर करणी केली आहे हे सांगून त्याने प्रियंकाचा विश्वास संपादन करून तिच्याकडून पुन्हा पैसे घेतले. त्याने या कुटुंबीयांकडून जवळपास ३२ लाख रुपये उकळले आहेत. 

मित्रानेच फोडले बिंगपवनच्या मित्रानेच त्याचे बिंग फोडत प्रियंकाला त्याच्या बनवेगिरीची माहिती दिली. त्याचबरोबर कोपरखैरणे येथील एका महिलेकडूनही तिला सर्वकाही सांगण्यात आले. तेव्हा प्रियंकाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

 

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी