शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भीमा -कोरेगाव हिंसाचार : अमळनेरमध्ये नऊ वाहनांची तोडफोड, दोघे संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 18:08 IST

सुरक्षेसाठी एस.टी.कर्मचाºयांचा अडीच तास चक्का जाम

ठळक मुद्देपोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडलेएस.टी.च्या सुरक्षेसाठी कर्मचाºयांचे चक्काजाम आंदोलनएस.टी.चालकाच्या डोक्याला मार

आॅनलाईन लोकमतअमळनेर, दि.२ : भीमा-कोरेगाव येथील हिंसाचाराचे पडसाद अमळनेरपर्यंत पोहोचले असून या ठिकाणी एस.टी.सह ९ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले आहे. तर एसटी कर्मचाºयांनी सुरक्षेसाठी अडीच तास चक्का जाम आंदोलन केले.भीमा-कोरेगाव येथील दगडफेकीचे पडसाद १ रोजी रात्री १० वाजता अमळनेरात उमटले. एक ट्रक धुळ्याकडे जात असताना अज्ञात तरुणाने हातातील लाकडी दांडक्याने पुढील काच फोडला तर रात्री दीड वाजेच्या सुमारास ५ ते ६ तरुणांनी तीन दुचाकींसह बसस्थानकात प्रवेश करीत तीन बसेसवर दगडफेक करीत नुकसान केले. एस.टी.महामंडळाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे सर्व दृश्य दिसत आहे. मात्र संशयितांची ओळख पटलेली नाही.एस.टी.चालकाच्या डोक्याला मारदरम्यान, सकाळी सर्व सुरळीत सुरू असताना अचानक दुपारी १२ वाजेच्या सुमारास गलवाडे रस्त्यावर त्यापाठोपाठ चोपडा रस्त्यावर एसटी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर काही वेळातच धुळे रस्त्यावर गॅस गोडाऊन जवळ ट्रक व एस.टी.ची तोडफोड करण्यात आली. यात धुळे आगाराचा चालक मोहन काशीनाथ पवार यांच्या डोक्यालाही मार लागला. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एस.टी.च्या सुरक्षेसाठी कर्मचाºयांचे चक्काजाम आंदोलनशहराच्या चारही बाजूने तोडफोड सुरू होताच संतप्त एस.टी.कर्मचाºयांनी प्रवाशी व एस.टी.सुरक्षेसाठी दुपारी दीड ते चार वाजेपर्यंत चक्का जाम आंदोलन सुरू केले. त्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली. या घटनेत अमळनेर आगाराच्या एम एच ०६, एस ८४९३, एम एच ४०, ९०२९, एम एच १४ बी टी १८५१, शिंदखेड्याच्या एन एच १४, बी टी २०८६ , व ९०७२ , नवापूर आगाराची एम एच १४ , बी टी २११४, शिरपूर आगाराची एम एच २० बी एल ९३७ या एस.टी.ची तर दोन खाजगी ट्रकची तोडफोड करून हजारो रुपयांचे नुकसान करण्यात आले.पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडलेदरम्यान, आर.के.नगर जवळ काही तरुण तोडफोड करून मोटार सायकल पळविल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे यांना मिळाली. प्रमोद बागडे, किशोर पाटील, सुनील पाटील, प्रमोद पाटील, बापू साळुंखे या पोलिसांनी शेतांमध्ये जाऊन त्यांचा पाठलाग केला. त्यात २ जण सापडले असून एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावAmalnerअमळनेरJalgaonजळगाव