Try to burn a bus driver in Jalgaon | जळगावात बस चालकाला जाळण्याचा प्रयत्न, कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद

ठळक मुद्देबसवर दगडफेकजळगाव आगारातून बसेस बंद

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 02- अहमदनगर-पुणे महामार्गावर कोरेगाव-भीमा येथे भीम सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मंगळवारी दुपारी 3 वाजता जळगाव शहरात उमटले. चोपडा येथून जळगावात येत असलेल्या बसवर जोरदार दगडफेक करीत बस चालक जगतराव लोटन पाटील यांच्या अंगावर आगीचे गोळे फेकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार लक्षात आल्याने बस चालकाने स्वत:चा बचाव केला. यात ते किरकोळ जखमी झाले व बालंबाल बचावले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शिवकॉलनी उड्डाणपुलावर घडली. 
या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे रस्त्यावर उतरत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. 
जाळपोळमुळे बस चालकाचे सीट पूर्णपणे जळाले तसेच बसवर दगडफेक केल्याने काचा फुटल्या. 

जळगाव आगारातून बसेस बंद
आंदोलनकत्र्यानी एसटी बसेसला लक्ष्य केल्याने जळगाव आगारातून बाहेर गावी जाणा:या बसेसच्या फे:या दुपारी 4.30 वाजेनंतर रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी ताटकळले होते. 


Web Title: Try to burn a bus driver in Jalgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.