भाऊसाहेब राऊत विद्यालयातील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:46 IST2021-02-20T04:46:21+5:302021-02-20T04:46:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भाऊसाहेब राऊत विद्यालयातील तीन शिक्षक दोन दिवस आधीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे सध्या ...

Bhausaheb Raut Vidyalaya teacher Corona positive | भाऊसाहेब राऊत विद्यालयातील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

भाऊसाहेब राऊत विद्यालयातील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भाऊसाहेब राऊत विद्यालयातील तीन शिक्षक दोन दिवस आधीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे सध्या ही शाळा बंद करण्यात आली आहे. त्यासोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दौऱ्यात सहभागी झालेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी योगेश देसले यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.

राऊत विद्यालयातील शिक्षकच पॉझिटिव्ह आल्याने ही शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. या वृत्ताला शाळेचे अध्यक्ष नगरसेवक कैलास सोनवणे यांनी देखील दुजोरा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी योगेश देसले हे देखील कोरोना बाधित आढळून आले आहेत. देसले हे जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांच्या दौऱ्यात देखील सहभागी झाले होते. या दौऱ्यानंतर मंत्री पाटील हे स्वत: पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर लगेचच माजी मंत्री एकनाथ खडसे हे देखील पॉझिटिव्ह आले आहेत. या दौऱ्यानंतर देसले देखील कोरोनाबाधित झाले आहे. सध्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी क्वारंटाईन झाले आहेत.

Web Title: Bhausaheb Raut Vidyalaya teacher Corona positive