शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा, आज करणार उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST2021-03-26T04:17:02+5:302021-03-26T04:17:02+5:30
जळगाव : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी बंद पुकारला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी ...

शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा, आज करणार उपोषण
जळगाव : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी बंद पुकारला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा काँग्रेस भवन परिसरात उपोषण केले जाणार आहे.
शेतकरी संघटनांनी 26 मार्चला भारत बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला असून पक्षाच्या वतीने सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जळगाव जिल्हा काँग्रेस भवन आवारात कोरोनाचे नियम पाळून उपोषण करून पाठिंबा देण्यात येणार आहे. तसेच सर्व ब्लॉक अध्यक्ष या भारत बंद ला पाठिंबा देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत.
यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेते व आजी,माजी आमदार खासदार,पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत जिल्हा मुख्यालयी उपोषणास उपस्थित राहावे, तसेच ब्लॉक अध्यक्षांनी या भारत बंद ला पाठिंबा देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करावे, असे आवाहन जळगांव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील यांनी केले आहे.