भालोदला फलकाची विटंबना

By Admin | Updated: July 2, 2017 16:20 IST2017-07-02T16:20:39+5:302017-07-02T16:20:39+5:30

भालोद येथे न्यू इंग्लीश स्कूल समोरील चौकातील थोर पुरूषाचे फलक अज्ञात समाजकंटकाने फाडल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

Bhalodla palekachi irony | भालोदला फलकाची विटंबना

भालोदला फलकाची विटंबना

 ऑनलाईन लोकमत 

यावल, दि. 2 - तालुक्यातील  भालोद येथे न्यू इंग्लीश स्कूल समोरील चौकातील थोर पुरूषाचे फलक अज्ञात समाजकंटकाने फाडल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. फैजपूरचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांना घटनेचे वृत्त समजताच   त्यांनी तातडीने भालोद गाठले. घटनास्थळा जवळच असलेल्या सीसीटिव्ही फूटेजची पोलिसांनी तपासणी केली. त्यात  संशयीत आरोपी  आढळून  आला नसल्याची माहिती पोलीस  सुत्रांकडून   मिळाली. गावात शांतता   कायम आहे.   सुरक्षिततेच्या दृष्टीने दंगा नियंत्रण पथकाच्या दोन तुकडय़ांना पाचारण करण्यात आले आहे. गावात जागोजागी पोलीस बंदोबस्त कायम आहे. डीवायएसपी  रायसिंग ठाण मांडून आहेत. सावद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Bhalodla palekachi irony