भाग्यश्री पाटीलने पटकावले विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST2021-02-21T04:30:32+5:302021-02-21T04:30:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लोकसंघर्ष मोर्चा आणि जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेने शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावच्या ...

भाग्यश्री पाटीलने पटकावले विजेतेपद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लोकसंघर्ष मोर्चा आणि जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेने शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावच्या भाग्यश्री पाटील हीने प्रथम तर गुणवंत कासार याने दुसरे स्थान मिळवले. तर औरंगाबादच्या इंद्रजीत महिंद्रकर याने तिसरे स्थान राखले.
या स्पर्धेचा समारोप शनिवारी लेवा भवनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, डॉ. ए.जी. भंगाळे, डॉ. विकास बोरोले, साजिद शेख, ॲड. विजय पाटील, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे फारुक शेख, अंकुश रक्ताळे, अनिस शाह, मुकुंद सपकाळे, विष्णू भंगाळे, अयाज अली, मुकेश टेकवानी, दिलीप सपकाळे, अमोल कोल्हे, स्मिता वेद, आर्बिटर प्रवीण ठाकरे उपस्थित होते.
स्पर्धेतील विजयी खेळाडू
(प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे)
८ वर्षे वयोगट
परम मुंदडा, अजय पाटील
दहा वर्षे वयोगट - तहसीन तडवी, देवांश राजगुरू, धैर्य गोला
१२ वर्षे वयोगट - जयेश सपकाळे , शेरोन ठाकूर, भिवा कोकणे
१५ वर्षे - दिगांश वाघ, उज्वल आमले, पूर्वा जोशी
महिला - श्रृती काबरा, गुरमीत कौर, खुशबु कोकाणे
खुला गट - भाग्यश्री पाटील, गुणवंत कासार, इंद्रजीत महिंद्रकर
फोटो - विजयी खेळाडूंसह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रतिभा शिंदे आणि इतर.