भडगाव, जि. जळगाव : भडगाव तालुक्यातील रोकडे फाटा येथे बस उलटून प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.रोकडे फाटा येथून ही बस जात असताना ती उलटली. त्या वेळी प्रवासी भयभीत झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन मदत केली व जखमींना रुग्णालयात हलविले. या अपघातात बसचे नुकसान झाले.
भडगाव तालुक्यात बस उलटली, जखमी प्रवाशांना हलविले ग्रामीण रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:40 IST