भडगाव जि. प. शाळेच्या नव्या इमारतीसाठी मागविला प्रस्ताव

By Admin | Updated: May 26, 2017 16:26 IST2017-05-26T16:26:09+5:302017-05-26T16:26:09+5:30

यशवंत नगर भागातील जिल्हा परिषदे शाळेच्या इमारतीचे वादळी पावसामुळे नुकसान झाले

Bhadgaon district Par. Proposed proposal for new school building | भडगाव जि. प. शाळेच्या नव्या इमारतीसाठी मागविला प्रस्ताव

भडगाव जि. प. शाळेच्या नव्या इमारतीसाठी मागविला प्रस्ताव

ऑनलाईन लोकमत

भडगाव,दि.26- यशवंत नगर भागातील जिल्हा परिषदे शाळेच्या इमारतीचे वादळी पावसामुळे नुकसान झाले असून चारही वर्ग खोल्यांचे पत्रे उडाले आहे. जिर्ण व धोकेदायक इमारतीला तडे पडले आहे. दरम्यान, आता शाळा इमारत दुरुस्ती नको तर नवीन चार वर्ग खोल्या बांधण्यात याव्या अशी मागणी होत आहे. याबाबतचा पं.स.चा ठराव करून बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
जि. प. चे शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी 26 रोजी सकाळी 10 शाळेस भेट देवून नुकसानीची पाहणी केली. गट शिक्षाधिकारी व्ही. आर. कुमावत यांना फोनवर संपर्क साधून नवीन वर्ग खोल्या मंजूर करण्यासाठी पं. स. चा ठराव पाठवा अशा सूचना केली.

Web Title: Bhadgaon district Par. Proposed proposal for new school building