भादली फायटर अंतिम विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST2021-01-02T04:13:29+5:302021-01-02T04:13:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्वामी समर्थ क्रिकेट क्लब आणि वडली बीसीसीआयतर्फे टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेत भादली फायटर संघाने ...

Bhadali Fighter Ultimate Winner | भादली फायटर अंतिम विजेता

भादली फायटर अंतिम विजेता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्वामी समर्थ क्रिकेट क्लब आणि वडली बीसीसीआयतर्फे टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेत भादली फायटर संघाने विजेतेपद पटकावले आहे. त्यात अंतिम सामन्यात भादली फायटर संघाने वडली बीसीसीआयवर विजय मिळवला, तर जळगाव इगल ब्लास्टर संघ तृतीयस्थानी राहिला.

उत्तम खेळ करणाऱ्या कर्णधार नीलेश शेवाळे, भूषण रोंदळे व स्वप्नील चौधरी यांना तुकाराम संतोष पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. जळगाव तालुक्यातील वडली येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते. आहे. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान, भूषण रोंदळे, शिवाजी जाधव, सचिन रोंदळे यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन पाथरीचे सरपंच शिरीष पाटील यांनी केले. ४८ संघानी यात सहभाग घेतला होता.

फोटो आहे.

Web Title: Bhadali Fighter Ultimate Winner