भादली फायटर संघाने पटकावले जेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST2021-01-04T04:13:39+5:302021-01-04T04:13:39+5:30
जळगाव : स्वामी समर्थ क्रिकेट क्लब व वडली बीसीसीआयतर्फे टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेत भादली फायटर संघाने बाजी मारली आहे. ...

भादली फायटर संघाने पटकावले जेतेपद
जळगाव : स्वामी समर्थ क्रिकेट क्लब व वडली बीसीसीआयतर्फे टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेत भादली फायटर संघाने बाजी मारली आहे. भादलीने वडली बीसीसीआयवर अंतिम सामन्यात विजय मिळवला, तर जळगाव ईगल ब्लास्टरने तिसरे स्थान मिळवले.
तिन्ही संघांचे कर्णाधार नीलेश शेवाळे, भूषण रोंदळे व स्वप्नील चौधरी यांना तुकाराम संतोष पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. जळगाव तालुक्यातील वडली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आहे. पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान, भूषण रोंदळे, शिवाजी जाधव, सचिन रोंदळे यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन पाथरीचे सरपंच शिरीष पाटील यांनी केले. ४८ संघानी यात सहभाग घेतला होता.
(फोटो मेल केला आहे.)