कोणाशीही पैज लावा, भाजपाला २९० जागा मिळणार - चंद्रकांत पाटील यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:34 PM2019-05-19T12:34:38+5:302019-05-19T12:35:09+5:30

महाराष्ट्रात ४४ जागा हमखास

Bet on anyone, BJP will get 290 seats - Chandrakant Patil's claim | कोणाशीही पैज लावा, भाजपाला २९० जागा मिळणार - चंद्रकांत पाटील यांचा दावा

कोणाशीही पैज लावा, भाजपाला २९० जागा मिळणार - चंद्रकांत पाटील यांचा दावा

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीत भाजपच विजयी होणार असून तुम्ही कोणाशीही पैज लावा, केंद्रात भाजपला २९० तर राज्यात महायुतीला ४४ जागा मिळतील, असा दावा राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना केला. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात बारामतीसह महायुतीला १० जागा मिळतील, असा दावाही त्यांनी व्यक्त केला.
पाटील हे शनिवारी दुष्काळाच्या पाहणीसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. संध्याकाळी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात भाकीत वर्तविले. ते म्हणाले की, केंद्रात भाजपला २९० जागा हमखास मिळणार आहेत. पक्षाने मतदानानंतर अंदाज घेतला आहे . त्या आकडेवारीवरून आपण हा विश्वास व्यक्त करीत असून जनतेचाही विश्वास वाढल्याने एवढ्या जागा आम्हाला हमखास मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वेळी जेवढी मते भाजपाला मिळाली त्यापैकी जास्त लोकांना योजनांचा लाभ मिळाल्याने ते समाधानी आहेत. त्यामुळे नेत्यांना भांडू द्या... आमचे भले झाले, असे देशवासीयांना वाटत असल्याने ते भाजपच्या पाठीशी असल्याचा दावाही त्यांनी केला.

Web Title: Bet on anyone, BJP will get 290 seats - Chandrakant Patil's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव