चाळीसगावच्या ‘आयएमए’ शाखेला ‘बेस्ट स्मॉल ब्रँच अवार्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 12:04 IST2017-12-10T12:00:58+5:302017-12-10T12:04:36+5:30
आज मुंबईत वितरण

चाळीसगावच्या ‘आयएमए’ शाखेला ‘बेस्ट स्मॉल ब्रँच अवार्ड’
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 10- इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘बेस्ट स्मॉल ब्रँच अवार्ड’ चाळीसगाव शाखेला जाहीर झाला असून रविवारी मुंबईत जुहू येथे होणा-या विशेष सोहळ्यात पुरस्काराचे वितरण अध्यक्ष अशोक तांबे यांच्याहस्ते होत आहे.
चाळीसगाव शाखेने वर्षभरात एकूण 18 उपक्रम राबविले. यात आरोग्य व सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. राज्यभरातून एकूण 28 शाखांनी असे प्रस्ताव दाखल केले होते. यातून चाळीसगाव शाखेची निवड झाली असून सचिव डॉ. विनोद कोतकर हे पुरस्कार स्वीकारणार आहेत.
चाळीसगाव शाखेला राज्यस्तरावरील असा सन्मान प्रथमच मिळत असून वर्षभरात आम्ही उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यामुळे पुरस्कार मिळण्याचा आनंद मोठा असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष डॉ. महेश पाटील व डॉ. विनोद कोतकर यांनी व्यक्त केली आहे.