बेंडाळे महाविद्यालयातर्फे उद्या कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST2021-05-25T04:18:20+5:302021-05-25T04:18:20+5:30

जळगाव : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे बुद्ध पौर्णिमा आणि आनंदयात्री डॉ. जी. डी. ...

Bendale College hosts poets' convention tomorrow | बेंडाळे महाविद्यालयातर्फे उद्या कविसंमेलन

बेंडाळे महाविद्यालयातर्फे उद्या कविसंमेलन

जळगाव : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे बुद्ध पौर्णिमा आणि आनंदयात्री डॉ. जी. डी. बेंडाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवोदित विद्यार्थी कवींचे नवे कवी… नवी कविता या ऑनलाईन कविसंमेलनाचे उद्या, बुधवारी सकाळी दहा वाजता आयोजन करण्‍यात आले आहे.

कविसंमेलनात विद्यार्थी कवी कमलेश महाले, मोना तडवी आणि सारांश सोनार हे आपल्या उत्तम रचना कविता सादर करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. गौरी राणे असतील. प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील आणि उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे राहणार आहेत. काव्यप्रेमी आणि रसिकांनी या ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थिती देऊन कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Bendale College hosts poets' convention tomorrow