ट्रक्टरखाली दाबला जाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:50+5:302020-12-04T04:45:50+5:30

ट्रक्टरखाली दाबला जाऊन तरुण जागीच ठार एरंडोल जि. जळगाव : रात्री शेतातून परतत असताना ट्रॅक्टर अचानक उलटले. ...

Being pressed under the tractor | ट्रक्टरखाली दाबला जाऊन

ट्रक्टरखाली दाबला जाऊन

ट्रक्टरखाली दाबला जाऊन

तरुण जागीच ठार

एरंडोल जि. जळगाव : रात्री शेतातून परतत असताना ट्रॅक्टर अचानक उलटले. त्याखाली

दाबला जाऊन सचिन श्रीराम सुरसे (३०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी

रात्री १ वाजता घडली.

एका ट्रॅक्टर मालकाचे ट्रॅक्टर घेऊन सचिन सुरसे हा रात्री शेतीकामासाठी गेला होता. शेतातील काम आटोपून तो रात्री एक वाजेच्या सुमारास गावाकडे येत होता. गावालगतच असलेल्या नाल्यात ट्रॅक्टर उलटले आणि त्याखाली दाबला जाऊन सचिन याचा करुण अंत झाला. गावातील रहिवाशी राजू भोई हे वाहनाने एरंडोलकडून रिंगणगाव येत असताना त्यांना नाल्यात पडलेला ट्रॅक्टर आणि त्याची सुरू असलेले हेडलाईट दिसले. या घटनेची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यांनी या तरुणाला बाहेर काढले.

सचिन सात आठ महिन्यापूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी माहेरी गेली होती .घरातील कर्ता

पुरुष गेल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत त्याच्यावर

अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Being pressed under the tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.