स्थायी समिती सभापतीपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:33+5:302021-08-24T04:20:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी ऑक्टोबर महिन्यात निवडप्रक्रिया होणार असून, यासाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने आता ...

Beginning of the formation of a front for the post of Standing Committee Chairman | स्थायी समिती सभापतीपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात

स्थायी समिती सभापतीपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी ऑक्टोबर महिन्यात निवडप्रक्रिया होणार असून, यासाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने आता हे पददेखील आपल्या ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली आहे. पुढील महिन्यात स्थायी समितीमधील ८ सदस्य निवृत्त होणार असून, नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. ही निवड त्या-त्या पक्षाच्या गटनेत्यांकडून केली जाणार आहे. मात्र, भाजपचा अधिकृत गटनेता कोण? याबाबत अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने स्थायीच्या आधी गटनेतेपदावरूनच भाजप व भाजप बंडखोर आमने-सामने येणार आहेत.

महापालिकेतील तिजोरीच्या चाव्या घेण्यासाठी शिवसेनेला भाजपचे गटनेतेपददेखील बंडखोरांकडे यावे यासाठी तयारी करावी लागणार आहे. जर भाजपचे गटनेतेपद भाजपकडेच राहिले तर भाजपच्या गटनेत्यांकडूनच निवृत्त होणाऱ्या सदस्यांची नावे स्थायी समितीसाठी दिली जातील. त्यामुळे आज स्थायीमध्येही बहुमत गमावून बसलेल्या भाजपला आपली संख्या वाढविता येणार आहे. मात्र, गटनेतेपद भाजप बंडखोरांकडे गेल्यास भाजपला स्थायी समितीचे सभापतीपद गमावण्याची वेळ येणार आहे.

सध्याचे स्थायी समितीमधील बलाबल

भाजप - ४

भाजप बंडखोर - ८

शिवसेना - ३

एमआयएम - १

जर गटनेतेपद भाजपकडे राहिले तर

भाजप - ७

भाजप बंडखोर - ५

शिवसेना - ३

एमआयएम - १

गटनेतेपद बंडखोरांकडे गेल्यास

भाजप - ३

भाजप बंडखोर - ९

शिवसेना - ३

एमआयएम - १

७ सदस्य राहूनही सभापतीपदासाठी भाजपला करावा लागणार संघर्ष

१. स्थायीमध्ये एकूण १६ जागा असून, आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. यामध्ये बंडखोर नगरसेवकांचे नवनाथ दारकुंडे, रेश्मा काळे, प्रतिभा देशमुख यांचा समावेश आहे. तर भाजपचे राजेंद्र घुगे पाटील, मुकुंदा सोनवणे, शिवसेनेचे नितीन लढ्ढा व नितीन बरडे तसेच एमआयएमत्या शेख सईदा युसूफ या निवृत्त होणार आहेत. नव्याने नियुक्ती करण्याचे अधिकार पक्षाच्या गटनेत्यांना राहणार आहेत.

२. भाजपने नवीन ५ सदस्यांची नियुक्ती केली तर भाजपकडे ७ सदस्य होणार आहेत. तर बंडखोर व शिवसेनेचे मिळून ८ व एमआयएम १ असे ९ सदस्य राहणार आहेत. त्यामुळे ५ सदस्यांची नियुक्ती झाली तरी भाजपला बहुमत मिळणे कठीण आहे. भाजपला गटनेतेपद आपल्याकडेच ठेवून, एमआयएमची मनधरणी करून, भाजप बंडखोरांनादेखील आपल्याकडे खेचावे लागणार आहे.

३. तेव्हाच मपनाच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे येतील, अन्यथा शिवसेना हे पद आपल्याकडे खेचून भाजपला महापालिकेत पूर्णपणे शक्तिहिन करून सोडण्याचीही शक्यता आहे.

Web Title: Beginning of the formation of a front for the post of Standing Committee Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.