दादावाडीचा पूल वापरण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:10+5:302021-09-24T04:18:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील महामार्ग चौपदरीकरणात पहिला दादावाडी येथील अंडरपास तयार होत आला आहे. त्यावरील पुलाचा ...

दादावाडीचा पूल वापरण्यास सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील महामार्ग चौपदरीकरणात पहिला दादावाडी येथील अंडरपास तयार होत आला आहे. त्यावरील पुलाचा वापर करण्यास वाहनधारकांनी आता सुरुवात देखील केली आहे. सध्या या पुलावरील काही किरकोळ कामे बाकी आहेत. त्यात पुलाला रंग देणे तसेच पुलावर आणखी एका लेअरचे काम अपूर्ण आहे. मात्र, जर पुलाला कुणी वापर करत असले तर त्याला अडवले जात नाहीत. मात्र अवजड वाहने किंवा चारचाकी वाहनांना हा पूल अद्याप खुला करण्यात आलेला नाही.
शहरातून जाणारा ७ किमीच्या महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. बांभोरीकडून शहरात प्रवेश केल्यावर दादावाडी येथे पहिला अंडरपास तयार करण्यात आला आहे. या अंडरपासवरील पूल पूर्णत्वास आला आहे. तेथे किरकोळ कामे राहिलेली आहेत. त्यामुळे काही दुचाकीधारक खालच्या गर्दीतून जाण्याऐवजी पुलाचा वापर करतात. तेथे त्यांना अडवले जात नाही. दुचाकीस्वार याचा वापर करू शकतात. मात्र, चारचाकींसाठी अद्यापही हा रस्ता खुला करण्यात आलेला नाही.
सद्य:स्थितीत शहरात दादावाडी, गुजराल पेट्रोल पंप, अग्रवाल चौक, प्रभात चौक येथे अंडरपास मंजूर आहेत. आणि त्यांचे काम वेगात सुरू आहे. त्यातील हा पहिला दादावाडी येथील अंडरपास पूर्णत्वास आला आहे. तसेच त्याला वापर देखील केला जात आहे.
कोट - या पुलाचे किरकोळ काम बाकी आहे. त्यावर आणखी एक लेअर टाकली जाईल. तसेच रंग देखील दिला जाणार आहे. मात्र, दुचाकी चालक पुलावरून जात आहेत. आम्ही त्यांना अडवत नाहीत. चारचाकींना मात्र तेथे प्रवेश नाही. - सुजित सिंग, ठेकेदार कंपनीचे अधिकारी