पोळ्याचा बाजार फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:22 IST2021-09-05T04:22:02+5:302021-09-05T04:22:02+5:30
जळगाव : सुरुवातीला पावसाची तुट आणि आता पावसामुळे हंगामाचे झालेले नुकसान असे दुहेरी संकट असताना आपल्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलांच्या ...

पोळ्याचा बाजार फुलला
जळगाव : सुरुवातीला पावसाची तुट आणि आता पावसामुळे हंगामाचे झालेले नुकसान असे दुहेरी संकट असताना आपल्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलांच्या कृतज्ञतेसाठी बळीराजाने पोळ्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.
पोळा हा सण वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या कृतज्ञतेसाठी साजरा केला जातो. सध्या बोहरा गल्ली परिसरात जिल्हाभरातून शेतकरी खरेदीसाठी येत आहे. सध्या बाजारात बैलांना सजविण्यासाठी खास झुल, विविध रंगाचे दोर, कवडी, गोफ, शिंगे रंगविण्यासाठी विविध रंग, गोंडे, नाथ, आरसे, घुंगरू चाळ उपलब्ध आहे.
जिल्हाभरातून शेतकरी आणि लहान व्यापारी येथे खरेदीसाठी येत असल्याने दिवसभर येथे पाय ठेवायलाही सध्या जागा नसल्याचे चित्र आहे.
भाव चढेच
गेल्यावर्षी पोळ्याच्या काळातच लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना वस्तू विकत घेता आल्या नव्हत्या. यंदा मात्र निर्बंध नसल्याने अनेकजण मनपसंत खरेदी करताना दिसून येत आहे. यंदा भाव मात्र काही प्रमाणात वाढले आहेत. यंदा दोर ६० रुपये जोडी, म्होरकी ६० रुपये जोडी, नाथ ८० रुपये जोडी, गोंडे ८० ते १०० रुपये, आरसे असलेले गोंडे, कापडी झुल १ हजार रुपये, घुंगरु चाळ ३०० रुपयापर्यंत उपलब्ध असल्याची माहिती व्यावसायिक रिकेश गांधी यांनी दिली.