वडाची पूजा करणाऱ्या महिलांवर मधमाशांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 06:24 PM2020-06-05T18:24:01+5:302020-06-05T18:25:40+5:30

वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करणाºया महिला तथा लहान मुलांवर मधमाशांनी हल्ला केला.

Bee attack on women worshiping Vada | वडाची पूजा करणाऱ्या महिलांवर मधमाशांचा हल्ला

वडाची पूजा करणाऱ्या महिलांवर मधमाशांचा हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देरावेर तालुक्यातील पाल येथील घटनाजखमींना सावदा रुग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
पाल, ता.रावेर, जि.जळगाव : येथील सातपुडा विकास मंडळ आवारात वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करणाºया महिला तथा लहान मुलांवर मधमाशांनी हल्ला केला. यात पाच ते सहा महिला व तीन ते चार लहान मुले जखमी झाली आहेत. त्यांना शुक्रवारी दुपारी तातडीने सावदा येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
कोरोनाचे सावट असले तरी येथे अनेक महिलांनी परंपरेनुसार वटपौर्णिमेनिमित्त वटपूजन केले. दरवर्षी वटवृक्षाची पूजा पाल आश्रमावर करण्यात येते. मात्र यंदा कोरोनामुळे पाल आश्रम बंद आहे. यामुळे गावातील महिला भगिनी सातपुडा मंडळ आवारातील शाळेजवळच्या परिसरात आल्या होत्या. सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान या ठिकाणी महिला भगिनी एकत्र जमा झाल्या. विधीवत वटवृक्षाची पूजा करत होत्या. याच दरम्यान झाडावरील मधमाशांचे मोहळ उठले व त्यांनी पूजा करणाºया महिलांवर हल्ला चढविला. यामुळे परिसरात महिलांची व लहान मुलांची एकच पळापळ सुरू झाली.
मधमाशांच्या हल्ल्यात सिंधूूबाई पाटील, मीराबाई जाधव,अजंना राठोड, वेदांत सोनार, रेखा सोनार, अवंतिका राठोड, शरयू सोनार आदी जखमी झाल्या. यात काहींची नावे समजू शकली नाही. जखमींना पाल येथील डॉ.विशाल पाटील यांच्या दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना सावदा येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
 

Web Title: Bee attack on women worshiping Vada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.