केळीचे घड वाहणारा विद्यार्थी बनला पोलीस उपनिरीक्षक
By Admin | Updated: June 1, 2017 13:15 IST2017-06-01T13:15:14+5:302017-06-01T13:15:14+5:30
निमखेडी बु।। येथील युवकाची यशोगाथा
केळीचे घड वाहणारा विद्यार्थी बनला पोलीस उपनिरीक्षक
>ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.1 - तालुक्यातील निमखेडी बु।। येथील मूळ रहिवाशी असलेला ललित पुंजाजी वरकडे हा विद्यार्थी 2016 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून दोन महिन्यांपूर्वी लागलेल्या निकालात उत्तीर्ण झाला आह़े अत्यंत गरीब पालखीच्या कुटुंबात जन्म झालेल्या ललितने केळीचे बेणे व घड वाहून हे यश मिळवल्याने त्याचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने पदवी शिक्षण घेत असताना त्याने केळीचे घड वाहने तसेच बेणे वाहण्यासारख्या मजुरीला सुरूवात केली. यातून केवळ त्याने पदवीपयर्ंतचे शिक्षणाचे नव्हे तळघरात खर्चाला हातभारदेखील लावला. त्याच बरोबर पदवी अभ्यास क्रमासोबतच त्याने एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत जीवनात काहीतरी करून दाखवण्याचे ध्येय ठेवले. सुरुवातीला त्याने पोलीस भरती चे उद्दिष्ट ठेवले व विशेष म्हणजे तो 2007 साली पोलीस भरती उत्तीर्ण देखील झाला. मात्र अधिकारी बनण्याची अभिलाषा बाळगत त्याने पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली व त्यात तो उत्तीर्ण झाला.़