इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बनला पिस्तूल तस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:28 IST2021-03-13T04:28:56+5:302021-03-13T04:28:56+5:30

मध्यप्रदेशातून पिस्तूल घेऊन पुण्यातील गुन्हेगारांना तो विक्री करीत होता, विशेष म्हणजे ४ वर्षापासून हा प्रकार सुरु होता. पुण्याच्या गुन्हे ...

Became an engineering student and became a pistol smuggler | इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बनला पिस्तूल तस्कर

इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बनला पिस्तूल तस्कर

मध्यप्रदेशातून पिस्तूल घेऊन पुण्यातील गुन्हेगारांना तो विक्री करीत होता, विशेष म्हणजे ४ वर्षापासून हा प्रकार सुरु होता. पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे. मराठे याच्यासह राहुल चंद्रकांत पवार (२६), तौफीक गुलाब शेख (वय २५) व राम गोरोबा जाधव (वय ३५, सर्व पुणे) यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांची ८ पिस्तुले आणि १५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

यात मुख्य सुत्रधार भूषण मराठे असून पवार याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात ५ गंभीर स्वरूपाचे तर जाधव याच्यावर राजगड पोलिस ठाण्यात खुनाचा एक गुन्हा दाखल आहे.पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली. पुण्याच्या खंडणी विरोधी पथक दोन शहरातील पिस्तूल प्रकरणांचा डाटा संकलीत करून तपास करीत असताना जळगाव जिल्ह्यातून एक जण देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी पुण्यात येणार असल्याचे समजले. त्यानुसार पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पथकाने सापळा लावून भूषण मराठे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३ पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे मिळाली. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना तो इतर आरोपींच्या संपर्कात आला. चोपडा हे मध्यप्रदेश सीमेपासून १५ ते २० किमी अंतरावर आहे. तेथूनच १० ते १५ हजार रूपयांना पिस्तुले विकत घेऊन तो पुणे शहरात ती पिस्तुले ३० ते ५०हजार रूपयांपर्यंत विकत होता असे सांगण्यात आले.

मराठेची तस्करी २०१६ पासून होती सुरु

मराठे याने २०१६ पासून पिस्तूल तस्करीच्या धंद्याला सुरूवात झाली होती. पुण्यात शिक्षणानिमित्त आला असताना झालेल्या ओळखीतून त्याने २०१७ आणि २०१८ मध्ये राहुल पवार, तौफिक शेख, आणि राम जाधव यांना ४ पिस्तुले विक्री केले. या गुन्ह्यात मराठेने विक्री केलेली पवार याच्याकडून २ पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे, शेख याच्याकडून १ पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे तर जाधव याच्याकडून १ पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याने आणखी कोणाला पिस्तुले विक्री केली आहेत का ? याचा सध्या तपाससुरू आहे. याप्रकरणात आणखी एक आरोपी निष्पन्न झाला असून त्याचा तपास सुरू आहे. अग्निशस्त्रे पुरविणारी परराज्य टोळी आहे का याचा तपासही सुरू आहे.

Web Title: Became an engineering student and became a pistol smuggler