पैशाच्या कारणावरुन टेलरला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST2021-02-21T04:30:54+5:302021-02-21T04:30:54+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहिती संजय गवांदे हे टेलर असून त्याचे शिवाजीनगर हुडको भागात व्यवसाय करतात. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ...

Beating Taylor for money | पैशाच्या कारणावरुन टेलरला मारहाण

पैशाच्या कारणावरुन टेलरला मारहाण

सूत्रांनी दिलेल्या माहिती संजय गवांदे हे टेलर असून त्याचे शिवाजीनगर हुडको भागात व्यवसाय करतात. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गजाजन बाविस्कर हा हुडकोत आला. त्याने याठिकाणी अर्शद अली यांच्यासह कारागिरांना पैशांची मागणी केली, त्यांनी पैसे दिले नाही, तर याठिकाणी काम करु देणार नाही अशी धमकी देवून निघून गेला. ही बाब अर्शद अली यांनी गवांदे कळविली. त्यानुसार गवांदे यांनी बाविस्कर याचा शोध घेतला असता महापालिकेच्या सार्वजनिक शौचालय येथे दोन साथीदारासोबत बसलेला होता. गवांदे यांना पाहताच बाविस्कर याने कपाळावर दगड मारुन फेकला. तर इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर बाविस्कर याने पुन्हा त्याच्या हातातील लोखंडी पट्टी डाव्या हातावर मारली. बोटाला गंभीर दुखापत केली. घटनेची माहिती मिळाल्यावर गंवादे यांचा मुलगा जयेश गवांदे हा घटनास्थळी आला. त्यालाही बाविस्कर तसेच त्याच्या दोघांनी लोखंडी पट्टीने मारहाण करुन उजव्या हाताला दुखापत केली. यानंतर जखमी गवांदे यांना जिल्हा रुग्णालयात तर मुलगा जयेश याला साकेगाव येथील डॉ उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title: Beating Taylor for money