पत्नीला न्यायला गेलेल्या जावयाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST2021-07-04T04:12:53+5:302021-07-04T04:12:53+5:30

अमळनेर : पत्नीला नांदवायला घ्यायला गेलेल्या जावयाला शालकाने लाकडी शिंगाड्याने मारहाण करून हात फ्रॅक्चर केल्याची घटना तालुक्यातील मुंगसे ...

Beating Javaya who went to take his wife | पत्नीला न्यायला गेलेल्या जावयाला मारहाण

पत्नीला न्यायला गेलेल्या जावयाला मारहाण

अमळनेर : पत्नीला नांदवायला घ्यायला गेलेल्या जावयाला शालकाने लाकडी शिंगाड्याने मारहाण करून हात फ्रॅक्चर केल्याची घटना तालुक्यातील मुंगसे येथे घडली.

धरणगाव तालुक्यातील खर्दे येथील रवींद्र छगन कोळी यांचे पत्नी सरला हिच्याशी कौटुंबिक वाद झाल्याने ती गेल्या महिनाभरापासून मुंगसे येथे माहेरी गेलेली होती. म्हणून रवींद्र २८ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता त्यांचे भाऊ किशोर छगन कोळी मेव्हणे दिलीप एकनाथ कोळी, बहीण छायाबाई कोळी याना घेऊन मुंगसे येथे आपल्या पत्नीला घ्यायला शालक प्रवीण भावलाल कोळी यांच्या घरी गेले असता त्याठिकाणी त्यांनी प्रवीणला दिलेले ८० हजार रुपयांची मागणी केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला प्रवीणने अंगणातील बैलगाड्याचे लाकडी शिंगाडे आणून रवींद्रच्या हातावर मारून हात फ्रॅक्चर केला.

दिलीप कोळी यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तुला पैसे परत करणार नाही. पुन्हा गावात पाय ठेवल्यास हात पाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. त्यांनतर पाऊस सुरू झाल्याने ते घरी निघून गेले व उपचारासाठी दवाखान्यात गेले. दवाखान्यातून आल्यावर रवींद्रच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

Web Title: Beating Javaya who went to take his wife