शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या कार्यक्रमात मारहाण झाली, तरुणाने घरी जाऊन जीवन संपवले

By विजय.सैतवाल | Updated: February 18, 2024 23:42 IST

भोलाणे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या : मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक

जळगाव : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना वाद होऊन मारहाण करण्यात आलेल्या भूषण लक्ष्मण कोळी (२०, रा. भोलाणे, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही  घटना रविवार, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता समोर आली. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली होती.तालुक्यातील भोलाणे येथे शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाला. त्या वेळी भूषण कोळी याला गावातील चार जणांनी बेदम मारहाण केली होती. हा वाद नागरिकांनी मिटवला व त्यानंतर भूषण हा घरी निघून गेला होता. मात्र मध्यरात्री त्याने राहत्या घरात गळफास घेतला, अशी माहिती मयत भूषणचे काका जनार्दन श्यामराव कोळी यांनी दिली.रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास भूषणने गळफास घेतल्याचे समोर आले. या वेळी कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे, पोहेकॉ विलास शिंदे आणि पोहेकॉ पाटील यांनी पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ आहे.

मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिकाभूषणला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यानंतर तेथे नातेवाईकांची गर्दी झाली होती. मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. या वेळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा हेदेखील रुग्णालयात पोहचले. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढली. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मयत तरुणाची आई व इतर नातेवाईक दुपारी तालुका पोलिस ठाण्यात पोहचले होते. तेथे त्यांनी फिर्याद दिली.

चार जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटकभोलाणे येथे भूषण कोळी या तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याप्रकरणी स्वप्‍नील गोकूळ कोळी, गोविंदा जगन कोळी, कृष्णा उर्फ छोटू अरुण कोळी आणि किरण गणेश कोळी या चार जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी स्वप्‍नील कोळी, गोविंदा कोळी, कृष्णा उर्फ छोटू कोळी या तिघांना अटक करण्यात आली असून किरण कोळी याचा तालुका पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगाव