शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

आपल्यातली नकारात्मकता काढून आनंदी रहा - अभिनेत्री नयना आपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 12:38 IST

‘लोकमत’शी संवाद

जळगाव : स्पर्धेत कायम टिकून राहण्यासाठी चिकाटी आणि धीर हवा. प्रलोभनाच्या मागे धावू नका, हे आभासी जग आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या संधी शोधा. कामाला कमतरता नाही. पण संयम राखला तर आपले अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. आपल्यातली नकारात्मकता काढून आनंदी रहा, असे मत ख्यातनाम अभिनेत्री नयना आपटे यांनी व्यक्त केले आहे. ७४ मराठी नाटके, २५ हून अधिक मराठी चित्रपट, विविध मालिका तसेच हिंदी, मराठी, गुजराथी रंगभूमी गाजवलेल्या पद्मश्री प्राप्त ज्येष्ठ कलावंत नयना आपटे या नुकत्याच ‘लोकमत’ सखी मंच आयोजित ‘सुनेच्या राशीला सासू’ या नाटकाच्या निमित्ताने जळगावात आल्या होत्या. त्यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : आपण या क्षेत्रात कशा आल्याआपटे : आई शांता आपटे उत्तम अभिनेत्री आणि गायिका. आईनेच केलेल्या नाटकात सुरुवातीला बालकलावंत म्हणून वयाच्या चवथ्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले. तिच माझी पहिली गुरू. तिच्याच इच्छेने कलेच्या प्रांतात आवड निर्माण होऊन याच क्षेत्राशी जोडले गेले.प्रश्न : वय वर्षे ४ ते आजतागयातच्या प्रवासा विषयी ?आपटे : कलेच्या प्रांतात करीअर करायच ठरवल्याने हा प्रवास सुखावणारा आहे. नकळत्या वयात रंगभूमीवर पदार्पण केले. विविध भूमिका साकारल्या. नृत्याचे शिक्षण पं.रोहिणी भाटे यांच्याकडून घेतले. घरातच गाणं असल्याने आईकडून गाणे शिकलो. नाटक, चित्रपट करत असतांना अनेक दिग्गज कलाकारांसमवेत भूमिका करायला मिळाल्या.उत्तम दिग्दर्र्शक लाभल्याने या प्रवासात खूप शिकायला मिळाले. अजूनही शिकत आहे.प्रश्न : एक कलावंत आणि एक गृहिणी यांचा मेळ कसा घालतात ?आपटे : कुटुंबाची मला पूर्ण साथ आहे. कला आणि कुटुंब यांचा सुंदर ताळमेळ साधते. प्रयोग संपल्यावर लगेचच मेकअप उतरून काही मिनीटात बाहेर पडते. घरी माझी मंडळी वाट पहात आहेत याची सतत जाणीव असते. पार्टी, लग्न, समारंभ यात जास्त जायला आवडत नाही. घरी असले की भाजी पोळी, वरण-भात, कोशिंबीर सगळं हाताने करते. गुळ टाकून केलेली पुरणपोळी मला छान करता येते. सकाळी ४ ला मला जाग येतेच. मग योगा, गाण्याचा रियाज, फिरायला जाणे नियमाने करते.सखींना काय सांगाल ? आणि सुनेच्या राशीला सासू नाटकाबद्दल ?भरपूर वाचन करा, वाचनाने विचारांची प्रगल्भता वाढते. चागलं ऐका, बोला पण कुणाशी ? तर बुद्धीमान लोकाशी. ते एखादा विषय कसा मांडतात त लक्षपूर्वक ऐका. आपलं आयुष्य आनंदी राहण्यासाठी अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच प्रामुख्यानं आपल मानसिक अन शारीरिक आरोग्य आपल्यातील नकारात्मका काढून टाकत आनंदी राहणं ही उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली आहे.सध्याच्या मुला-मुलींना काय सांगू इच्छिता ?अभिनय, गाण, नृत्य अथवा कोणतीही कला ही उपजत असली तरी गुरूकडे राहून आत्मसाथ केली जावी. सध्या मुल रिअ‍ॅलिटी शो मधून बक्षीस मिळवून रातोरात स्टार होतात. पण या स्पर्धेत कायम टिकून राहण्यासाठी चिकाटी हवी, धीर हवा, प्रलोभनाच्या मागे धावू नका, हे आभासी जग आहे. मुंबर्ईचेच स्वप्न न पाहता आपल्या आजूबाजूला असणाºया संधी शोधा. कामाला कमतरता नाही. पण संयम राखला तर आपले अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. प्रयोग उत्तम होण्यासाठी प्रेक्षकांचीही जबाबदारी असते.नाटक कसे करावे, याचे जसे शिबिर असते. तसेच नाटक कसे बघावे, यासाठीही शिबिर घ्यायला हवीत. - नयन आपटे

टॅग्स :Jalgaonजळगाव